शिरूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.. दोनशे रुग्णांची तपासणी
शिरूर (प्रतिनिधी) :
मातंग एकता आंदोलन, शिरूर व आधार रुग्णसेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लो. आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शिरूर शहरातील लो. आण्णाभाऊ साठे चौक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक विनोद भालेराव, चेतन साठे, अविनाश शिंदे, विजय नलावडे, आयुष यादव, मातंग एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष सतीश बागवे, खजिनदार काकासाहेब पाटोळे, अविनाश साबळे, सुहास भोसले, शिवाजी पवार, सोनाली ससाणे, रमेश साळवे, नारायण दामसे, राजेंद्र जाधव, तर आधार रुग्णसेवा बहुउद्देशीय संस्थेचे डॉक्टर अंकुश कांबळे, डॉ वर्षा नलावडे, डॉ.विजय नलावडे,डॉ. आयुष यादव यांचे उपस्थित झाले.
शिबिरामध्ये संगणकीकृत पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात आली. नागरिकांना मोफत डोळ्यांचा नंबर काढून देण्यात आला. तसेच चांगल्या प्रतीचे चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करून निवड झालेल्यांचे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे.
या शिबिरात एकूण 200 रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे देण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले.