आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर येथे जन्माष्टमी उत्सव निमित्त दहीहंडी फोडली
शिरूर प्रतिनिधी
आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून साजरा करण्यात आला.
बालगोपालांनी श्रीकृष्णावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांचे मन जिंकले. माता पालकांनी कृष्ण पाळणा हलवून बालकृष्णाचे स्वागत केले, तर पिता पालकांनी नटखट कृष्णासोबत दहीहंडी फोडून उत्सवाला अधिक रंगत आणली.
या प्रसंगी प्राचार्या अश्विनी घारू यांनी श्रीकृष्णाची कथा सांगून “मैत्री कशी असावी” याचा सुंदर संदेश बालगोपाल व पालकांना दिला. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व माता-पिता पालक व विद्यार्थी यांचे कौतुक व आभार व शिक्षकवृंदांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि सरावामुळे हा जन्माष्टमी सोहळा यशस्वीरीत्या पार पडला, याचे प्राचार्यांनी कौतुक केले.संपूर्ण सभागृह आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने उजळून निघाले.