शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक पाच झाली आयडॉल शाळा पालकांनी नगरपरिषद शाळांकडे वळणे गरजेचे आहे - प्रकाशभाऊ धारिवाल उद्योगपती
शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपालिकेच्या शाळा अद्यावत झाले असून, शाळेत अद्यावत कॉम्प्युटर(संगणक) लॅब अद्यावत सुख सुविधा दिल्या जात असून पालकांनी नगरपरिषद शाळांकडे वळणे गरजेचे असल्याचे सांगून येथील शिक्षक मुलांना चांगले शिक्षण देत असल्याचे प्रतिपादन शिरूर चे माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांनी सांगून शाळा क्रमांक पाच केंद्र शासनाच्या पी एम श्री योजनेची मान्यता मिळाली ही शाळेच्या दृष्टीने व शिरूर शिक्षण मंडळाच्या दृष्टीने गौरवाची गोष्ट आहे.
पीएमश्री शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक ५ येथे आयडल सेंटरचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी किसन खोडदे, शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, शाळा क्रमांक पाच मुख्याध्यापक संतोष चव्हाण , अँड. रविंद्र खांडरे, स्वच्छता निरीक्षक डी. बी. बर्गे, माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, निलेश लटांबळे, विनोद भालेराव, तुकाराम खोले, संतोष शितोळे, अविनाश मल्लाव, योगेश जामदार, निलेश जाधव, व्यावसायिक राहुल ओस्तवाल, जीनगरपरिषद अधीक्षक राहुल पिसाळ,बाळासाहेब जामदार, अशोक वाघमोडे,बाळासाहेब जामदार, मुख्याध्यापक संजय वाघ, समिदा यादव, सचिन शिंदे, बाबासाहेब पवार,हाफीज बागवान,समाधान मुंगसे, विकास जाधव, दीपक कोल्हे, आदित्य बनकर उपस्थित होते,
यावेळी बोलताना उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल म्हणाले प्रत्येक पालकांना आपला मुलगा चांगला शिकावा व मोठा व्हावा अशी इच्छा असते त्याचे प्रमाणे नगरपालिका शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरून सर्वसामान्य व सर्व मुलांना नगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेता येईल व आता बदलत्या काळामध्येसध्या मोबाईल मुळे मुले बिघडत चालली असून मोबाईलमध्ये जे चांगले उपयोग आहेत ते मुलांच्या शिक्षणासाठी करून घ्यावे परंतु मोबाईलचा वापर मुले बिघडतील असे होऊ नये पालकांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिरूर नगरपरिषद शाळेचा पीएमश्री या केंद्र शासनाच्या योजनेत नंबर लागणे ही नगरपरिषद शाळाच्या दृष्टीने गौरवाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगून यासाठी मोठ्या निधी आला असल्याचे धारिवाल यांनी सांगितले.
शिरूर नगर परिषद शाळा इयत्ता आठवी नववी दहावी हे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाला प्रस्ताव देण्यात आला आहे त्यामुळे आता शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांपुढे मोठे आव्हान आहे तर शाळा क्रमांक पाच या शाळेचा लवकरच नवीन वास्तू तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचा निधी शासनाकडून आला असून नगरपालिका शाळा चांगल्या सुविधा व चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी कंबर कसली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले ज्याप्रमाणे शाळा क्रमांक पाच नगरपालिका शाळा पीएमश्री या शासनाच्या योजनेची मान्यता मिळाली त्याप्रमाणे इतर शाळा ही आता आयडॉल करणार असल्याचे सांगितले.
शिरूर नगर परिषदेच्या सर्व शाळा अद्यावत करण्यासाठी व विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना सूचना दिल्या असून शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. शाळा क्रमांक पाच पीएमश्री या योजनेत बसली असून यामुळे प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल टीव्ही व अद्यावत कॉम्प्युटर लॅब बरोबर आता मुले ही स्मार्ट कशी होतील याकडे लक्ष देणार असल्याचे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी किसन खोडदे यांनी सांगितले.
स्मार्ट मॉडेल शाळा म्हणून शिरूर नगर परिषद शाळा क्रमांक ५ ची निवड होणे अभिमानास्पद आहे. शाळेमध्ये कॉम्प्युटर, सायन्स प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही शाळा चे कामकाज राज्य पातळीवर देशपातळीवर पहाता येत असल्याचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगून, आज राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर नगरपरिषद स्मार्ट शाळेची ऑनलाइन पाहणी केली आहे.
प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक संतोष चव्हाण तर सूत्रसंचालन शिक्षक भानुदास हंबीर यांनी केले.
.