शिरूरच्या अतिक्रमानावर नगरपालिकेचा बुलडोझर प्रीतम पाटील मुख्याधिकारी
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर शिरूर नगरपरिषदेने आज बुलडोजर चालवला असून शेकडो अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केले असल्याची माहिती शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.
शिरूर शहरात कायमस्वरूपी असणारे टपऱ्या, बंद टपऱ्या, हातगाड्या शेड ,बाहेर आलेले बोर्ड, तसेच रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळे होणाऱ्या हातगाड्या, दुकाना बाहेर काढलेले शेड, रस्त्याच्या वळणावर असणारी अतिक्रमणे या सर्वांवर आज शिरूर नगर परिषदेने कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही अशी चालू राहणार असल्याची माहिती शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी पाटील यांनी दिली.
यावेळी नगरपरिषद अधीक्षक राहुल पिसाळ, बांधकाम अभियंता पंकज काकड, अतिक्रमण विभाग प्रमुख समाधान मुंगसे, अभियंता शामली लाड, स्वच्छता अभियंता आदित्य बनकर, विद्युत अभियंता तेजस शिंदे, कर निरीक्षक माधव गाजरे, दीपक कोल्हे, विजय आंधळे, मुकादम मनोज अहिरे ,किरण जाधव, पोलीस कर्मचारी,नगरपरिषद कर्मचारी स्वच्छता कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आज दुपारी साडेबारा वाजता सुरू केलेली ही कारवाई संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होती. याकरिता शिरूर नगरपरिषदेचे कर्मचारी सफाई कर्मचारी शिरूर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी व चार महिला पोलीस व चार पुरुष पोलीस असा मोठा फौजफाटा , तीन जेसीबी, ट्रक ट्रॅक्टर,आज या कारवाईसाठी उपस्थित होता.
शिरूर शहरात फेरीवाला धोरण अवलंबणार असून यासाठीच्या पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे सुरू असून शहरातील हातगाडी धारक व पथारिधारक यांच्यासाठी याचा उपयोग होणार आहे. आज जप्त कलेल्या टपऱ्यादुकानांचे मटेरियल , हातगाडी, स्टॉल,यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले.
शिरूर शहरातील कारवाई गेल्या महिन्यापासून प्रलंबित होती अनेक दुकानदार यांना याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या नोटीसा नंतर ही कारवाई करण्यात आली . त्या अगोदर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने या भागाची पाहणी केली होती नागरिकांचे म्हणणेही लक्षात घेतले होते. तसेच ज्यांची अतिक्रमण आहे त्यांच्याशी चर्चा केली होती त्यांना ती गाडून घेण्यासाठीचा विनंती नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. अखेर ही आज कारवाई झाली असल्याचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगून यापुढे शहरात अतिक्रमण होऊ नये यासाठी नगरपरिषद सतर्क राहणार असल्याची त्यांनी सांगितले .