शिरूर तालुक्यात हात उसने घेतलेले पैसे मागितले म्हणून खून करून पळून जाणा-या दोन आरोपीना शिरुर पोलीसांना ठोकल्या बेडया"
शिरूर, प्रतिनिधी
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे 53 वर्षीय पुरुषाचा उसने घेतलेले पैसे मागितले म्हणून दोघांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण खून केला असल्याची कबुली दोघा आरोपींनी दिली असून, या आरोपींना अटक करण्यात शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाला यश आले असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
सुनिल उर्फ शैलेश सुखदेव मुळे (वय. २८ वर्षे),रमेश बारकु पवार (वय. २३ वर्षे, दोघे रा. फाकटे ता. शिरूर जि. पुणे ) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून या दोघांनी खूनाची कबुली दिली आहे.
देवराम नानाभाऊ टेके (वय ५३, रा.फाकटे ता. शिरूर) ) असे खून झालेल्या पुरुषाचे नाव आहे.
याबाबत महेश देवराम टेके (रा फाकटे ता. शिरूर जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी शिरूरला जाऊन येतो म्हणून मोटरसायकलवर घराबाहेर पडलेले देवराम टेके रात्रीपर्यंत घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता त्यांची दुचाकी कवठे येमाई–गांजेवाडी रोडलगत उभी सापडली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला. डोक्यावर व मानेवर गंभीर जखमा असल्याने त्यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता..सदर गुन्हयाची गांभीर्यता व संवेदनशिलता लक्षात घेता पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथासाहेब जगताप, नितीन सुदीक, अनिल आगलावे, शरद वारे, अरुण उबाळे, शिवाजी बनकर, पोलिस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, सागर बोराडे, सोनाजी तावरे, संतोष बनसोडे, शंकर बल्लाळ, मनोज मोरे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील, भाउसाहेब ठोसरे यांची तपास पथके तयार केली तपास्पथकाने तांत्रीक विश्लेषण व सी.सी.टी. व्ही. फुटेज तसेच गुप्त बातमीदारांमार्फत शोध घेत असताना पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना आरोपी यांची माहिती मिळाली त्यांचा शोध घेताना आरोपी सरदवाडी येथील अहील्यानगर ते पुणे कडे जाणा-या महामार्गावरील रायगड हॉटेल जवळ आरोपी एका झाडाच्या खाली बसलेले आहे अशी माहीती मिळणाल्याने त्या ठिकाणी पोलीसांनी जावुन सापळा लावुन दोन्ही आरोपीतांना शिताफिने ताब्यात घेतले असता आरोपीतांकडे तपास केला असता आरोपी सुनिल उर्फ शैलेश सुखदेव मुळे व रमेश बारकु पवार यांनी मयत देवराम नानाभाउ टेके यास त्याच्याकडुन हात उसने घेतलेले दिड लाख रुपये सतत मागत असल्याचे कारणावरुन मयत देवराम नानाभाउ टेक यास लोखंडी रॉडने जिवे ठार मारुन त्याच्या अंगावरील सोन्याचे दागीने काढुन घेवुन त्याचा मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने उसाच्या शेतात टाकुन गेले बाबत कबुली दिली असुन त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आले आहे.
गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड, मयताचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीसशिरूर पोलीस करत आहे.