सणसवाडीत घरगुती वादातून पतीकडून पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार
शिरूर ( प्रतिनिधी )
सणसवाडी ता. शिरुर येथे घरगुती बाजारातून पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून पत्नीला गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कौशल्या बाबासाहेब सोनवणे (वय ३५ वर्षे सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चोंडी ता. धारुड जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाबासाहेब हरिकिसन सोनवणे (वय ४१ वर्षे सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चोंडी ता. धारुड जि. बीड) याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे सणसवाडी ता. शिरुर कौशल्या सोनवणे यांच्या घरातील सिलेंडर संपल्याने त्यांनी पतीला सिलेंडर आणण्यासाठी सांगितले होते, त्यांनतर सायंकाळी पती बाबासाहेब घरी आल्यानंतर कौशल्या यांनी सिलेंडर का आणला नाही असे म्हटले असता त्यांच्यात वाद झाला दरम्यान कौशल्या तशाच उपाशी झोपी गेल्या, त्यांनतर पहाटेच्या सुमारास बाबासाहेब हे उठले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला असता बाबासाहेब यांनी घरातील ऊसतोडणीचा कोयता घेऊन कौशल्या यांच्या डोक्यात वार करत जखमी केले, सदर घटनेत कौशल्या सोनवणे जखमी झाल्या असून याबाबत कौशल्या बाबासाहेब सोनवणे वय ३५ वर्षे सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चोंडी ता. धारुड जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाबासाहेब हरिकिसन सोनवणे वय ४१ वर्षे सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चोंडी ता. धारुड जि. बीड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.