शिरूर भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे वतीने गणेशोस्तवानिमित्त घरगुती गौरी गणपती आरास स्पर्धेचे आयोजन
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर येथील भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे वतीने गणेशोस्तवानिमित्त घरगुती गौरी गणपती आरास स्पर्धेचे आयोजन केले असून, दिनांक २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे
विजेत्या सर्व स्पर्धकांना सभागृह नेते श्री ‘प्रकाशभाऊ धारीवाल गणराया करंडक’ आणि आकर्षक बक्षिसे दिले जाणार असल्याचे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले
यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष शिरूर शहर व परिसरातील घरगुती गौरी गणपती आगमनासाठी केलेल्या आकर्षक सजावटी ला वाव मिळावा या साठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते
या स्पर्धेत गणपती सजावट गौराई आरास व लहान मुलांसाठी सेल्फी विथ बप्पा अशा तीन स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे कुटे यांनी सांगितले
प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्यांना प्रकाशभाऊ धारिवाल गणराया करंडकाने गौरविले जाते
स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि यांनी सहभागासाठी मो नंबर 93703 33921 वर संपर्क करावा असे आवाहन कुटे यांनी केले