शिरूर रामलिंग येथे ‘राजमाता गणेश मित्र मंडळा’च्या गणेशाची भव्य मिरवणूक उत्साहात
शिरूर प्रतिनिधी :
“रडू नको बाळा मी पाण्याला जाते” या लोकप्रिय गवळणीच्या सुरांनी आणि भक्तिगीतांच्या गजरात शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील राजमाता गणेश मित्र मंडळाच्या गणेशाची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. गायिका शिवानी शिंदे हिने सुमधुर आवाजात सादर केलेल्या या गवळणीने भजन अभंग याने संपूर्ण रामलिंग परिसर भक्तिमय झाला होता.
काल दुपारी निघालेल्या या मिरवणुकीत आळंदी येथील राजमाता मुलींच्या वारकरी संस्थेच्या दिंडीने विशेष आकर्षण निर्माण केले. दिंडीतील हरिनामाचा गजर, अभंग व गवळणी यामुळे रामलिंग व शिरूर शहरातील नागरिक मंत्रमुग्ध झाले. गणेश भक्तीने भारलेले वातावरण पाहून उपस्थित सर्वांनी गणरायाच्या महालात प्रार्थना पोहोचली असेल, अशी भावना व्यक्त केली.
यानंतर मंडळाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. आरतीनंतर गणरायाचे महालात आगमन होऊन संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार,अध्यक्ष : आदित्य मेनसे,कार्याध्यक्ष वरुण शहाजी पवार
उपाध्यक्ष तेजस रामदास कवठाळे, ऋषीकेश सुभाष दिवटे,अजिनदार प्रतिक रमेश मचाले,सह-अजिनदार : श्रेयश परेश शेटे,सेक्रेटरी : यश अनिल पाटील, ओमकार जाधव, तेजस अशोक निचित, सदस्य रामदास जिजाबा टाकळकर, नानाभाऊ नवनाथ मैड, हरीभाऊ देडगे, स्वप्नील देवीदास वेताल, सचिन संतोषराव वेताल, पियुष संजय वेदपान्क, वैभव वाकळे, सुधाकर कैलास मिङ्गुले, ओम गिरीष मगर, प्रशांत बाबासाहेब गव्हाणे, स्वप्नीलभैया शोरात, आशिष दत्ताप्यय थोरात, निखील गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, राजदिप आलेराव, सिद्धांत मरगर, ओम तन्मय वायसे, नील सोनार, सुयोग उचाले, ओम राठोड, श्रेयश शरद पवार, आर्यन युडे आदींनी कार्यभार सांभाळला.
शिरूर व रामलिंग परिसरात गणेशोत्सवाचे औचित्य साधून झालेली ही मिरवणूक भक्तिभाव, भजन, अभंग आणि रामलिंग उत्साह आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम ठरली.