मुखईत डॉक्टरांच्या शिताफीने मेंढीवर सिझेरियन शस्त्रक्रिया
डॉ. अमोल येंडेंच्या प्रयत्नाने मेंढपाळाच्या मेंढीसह कोकराला जीवदान
शिरूर ( प्रतिनिधी ) मुखई ता. शिरुर येथील एका मेंढपाळाच्या गरोदर मेंढीला प्रसूतीसाठी अडचण झाल्याने पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे यांनी शर्थीचे प्रयत्न करुन मेंढीवर सिझेरियन शस्त्रक्रिया करुन दोन कोकरांना बाहेर काढले मात्र एक कोकरु दगावून मेंढीसह एका कोकराला जीवदान मिळाले आहे.
मुखई ता. शिरुर येथील संतोष रुपणार या मेंढपाळाच्या गरोदर मेंढीला प्रसूतीसाठी अडचण निर्माण होऊन मेंढी अस्वस्थ झाली, याबाबतची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने मुखई येथे धाव घेत मेंढीची तपासणी केली असता मेंढीच्या पोटात दोन कोकरे असल्याचे निदर्शनास आले, यावेळी डॉ. अमोल येडे यांनी मेंढपाळाशी चर्चा करत मेंढीवर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, यावेळी मेंढीवर तातडीने शस्त्रक्रिया करत दोन कोकरांना बाहेर काढले मात्र एक कोकरु सुखरूप असून एक कोकरु दगावले तर डॉ. अमोल येडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने मेंढीसह एका कोकराला जीवदान मिळाले असल्याने मेंढपाळ व नागरिकांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे यांचे आभार मानले आहे.
स्वतंत्र चौकट १ –
शेतकऱ्यांनी जनावरांना प्रसूती दरम्यान त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधना त्यामुळे जनावरे व नवजात पिल्लांचे प्राण वाचू शकते असे असे पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – मुखई ता. शिरुर येथे मेंढीवर सिझेरियन शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय अधिकारी व आदी.