शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर - प्रीतम पाटील मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून कालच नगर परिषदेच्या वतीने प्रारूप प्रभाग रचना शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेवर १८ ते दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत हरकती सूचना घेण्यात येणार आहे.
प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार दिनांक 18 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभाग रचना कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध असेल, तसेच नगरपरिषद च्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. त्यावर नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात. इच्छुक नागरिकांनी आपली हरकती / सूचना नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये लेखी स्वरूपात सादर कराव्यात. हरकती व सूचना सादर केलेल्या नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीसाठी वेळ देण्यात येऊन त्यांचे म्हणणे ऐकण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा व सूचनांचा विचार केला जाणार नाही.
यंदाच्या निवडणुकीसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 21 नगरसेवक निवडून द्यायचे होते त्याप्रमाणे यंदाच्या पंचवार्षिकेसाठी तीन जागांची वाढ झाली असून यामध्ये 24 नगरसेवकाचा निवडून द्यायची असून त्यासाठीच्या 12 प्रभागाची प्रभाग रचना जाहीर झाली असून प्रत्येक प्रभागांमध्ये दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नगर परिषदेचे निवडणुकीचे आतुरतेने वाट पाहणारे इच्छुक आता प्रभाग रचना चालू लागले आहेत.
या प्रभाग रचनेमध्ये चुकीचे किंवा दोष असतील तर त्या संदर्भात नागरिकांनी हरकती व सूचना घ्यायच्या आहे. या हरकती व सूचना घेण्यासाठी नागरिकांना अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे.
यामुळे अनेक दिवसांपासून शिरूर नगर परिषदेची निवडणुकीची वाट पाहणारे इच्छुक आता नगरपरिषदेमध्ये घरट्या घालू लागले आहे.
प्रभाग रचना कायम झाल्यानंतर या ठिकाणी आरक्षणा जाहीर होण्यासाठी सोडत निघणार आहे त्या सोडतीमधे सर्वसाधारण ओबीसी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण आरक्षण जाहीर होणार आहे.
संभाव्य प्रभाग रचनेचे सूचना व नकाशा शिरूर नगर परिषदेमध्ये लावण्यात आला आहे. नागरिकांनी हा नकाशा व प्रभाग रचना पाहून त्यावर हरकती सूचना मांडाव्यात असे आवाहन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले आहे.