नेचर गार्ड ऑर्गनायजेशन संस्था उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित
शिरूर ( प्रतिनिधी )
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथून वन्यजीव रक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या नेचर गार्ड ऑर्गनायजेशन संस्थेने वन्य जीवांच्या रक्षणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन संस्थेला पुणे वनविभाग व वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांच्या वतीने उत्कृष्ठ संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथून वन्यजीव रक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या नेचर गार्ड ऑर्गनायजेशन संस्थेने वन्य जीवांचे रक्षण करत अनेक सर्प निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले करत सर्प जनजागृती केली असून नेचर गार्ड ऑर्गनायजेशन संस्थेच्या कार्याची दखल घेत पुणे वनविभाग, वन्यजीव रक्षक संस्था मावळ, माझी वसुंधरा अभियान, रोटरी क्लब ऑफ गोल्डन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ममता राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, नगरसेवक संतोष दाभाडे, वन्यजीव रक्षक संस्था मावळचे संस्थापक निलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे, सेवानिवृत्त वनाधिकारी संजय मारणे, नरेंद्र पाटील, राहुल काकडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे, याप्रसंगी नेचर गार्ड ऑर्गनायजेशन संस्थेचे अध्यक्ष गणेश टिळेकर, सचिव शुभांगी टिळेकर, वैभव निकाळजे यांसह आदी उपस्थित होते, तर या संस्थेच्या सन्मानाबद्दल संस्थेचे शिरुर तालुक्यातून कौतुक होत आहे.
फोटो खालील ओळ – तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील नेचर गार्ड ऑर्गनायजेशन संस्थेला सन्मानित करताना मान्यवर.