आमदाबाद फाट्यावर पिस्तुले घेऊन फिरणारे दोघे जेरबंद...शिरुर पोलिसांच्या दमदार कामगिरीत तीन पिस्तुले १० जिवंत काडतूसे जप्त
शिरूर ( प्रतिनिधी )
आमदाबाद फाटा ता. शिरुर येथील मलठण रस्त्याने दुचाकीवर पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकांनी पकडले असून त्यांच्याकडून तीन पिस्तुले व १० जिवंत काडतूसे असा ऐवज जप्त केला असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली असून अरुण पिन्ना शिरूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता 1 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.
याप्रकरणी समीर उर्फ नवाब वजीर शेख (वय २० वर्षे रा. शिरटे ता. वळवा जि. सांगली) व दिपक शिवलिंग वांगणे (वय २० वर्षे रा. अमरदिप सोसायटी कारेगाव ता. शिरुर जि. पुणे ) या दोघांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस शिपाई सचिन आजिनाथ भोई (रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक १९ ऑगस्ट रोजी रात्री पावणे आठ वाजता शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आमदाबाद फाटा ता. शिरुर येथील मलठण रस्त्याने दोन युवक दिचाकीहून दोन पिस्तुले व जिवंत काडतुसे घेऊन फिरत आहे. ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना देऊन, पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अक्षय कळमकर, पोलीस शिपाई सचिन भोई, रवींद्र आव्हाड, निखील रावडे, विजय शिंदे, नीरज पिसाळ, रवींद्र काळे,अजय पाटील यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला असता त्यांना दोन संशयित युवक दुचाकीन आल्याचे दिसून आले, दरम्यान पोलिसांनी सदर युवकांना ताब्यात घेत झडती घेतली असत्या त्यांच्या जवळ दोन पिस्तुले व जिवंत काडतुसे मिळून आले, त्यांनतर त्यांच्याकडे चौकशी करत पोलिसांनी एका युवकाच्या घरातून पुन्हा एक पिस्तुल जप्त केले असून, असे त्याच्याकडून ३ पिस्तुले १० जिवंत काडतूसे व एक्टिवा मोटरसायकल १लाख १५ हजार किमतीचे जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस शिपाई सचिन आजिनाथ भोई रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी समीर उर्फ नवाब वजीर शेख वय २० वर्षे रा. शिरटे ता. वळवा जि. सांगली व दिपक शिवलिंग वांगणे वय २० वर्षे रा. अमरदिप सोसायटी कारेगाव ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.