शिरुरमध्ये पोलीस असल्याच्या बहाण्याने इसमाला लुटले
शिरूर
( प्रतिनिधी ) शिरूर शहरातील बाबुराव नगर येथे पुरुषाला आम्ही पोलिस आहोत असे बोलून ओळखपत्र दाखवत गणपतीचे दिवस आहेत आपल्या जवळील सोन्याचे दागिने रुमाला मध्ये ठेवा असे सांगून सोन्याची चैन व अंगठी मोटर सायकलवर आलेल्या दोघांनी लांबवली.
शिरुर शहरातील बाबुरावनगर येथे बळीराम इंदलकर हे उभे असताना दोन इसम त्यांच्याजवळ आले, त्यांनी बळीराम यांना ओळखपत्र दाखवत आम्ही पोलीस असल्याचे सांगत सध्या गणपतीचे दिवस आहे, अंगावर दागिने कशाला घालता असे म्हणून हातातील अर्धा तोळा वजनाची अंगठी काढण्यास सांगून गळ्यातील सोन्याची चैन काढून रुमाल काढा त्यात बांधून ठेवा असे म्हटले, दरम्यान बळीराम खिशातून रुमाल काढत असताना दोघे बनावट पोलीस बळीराम यांचे अडीच तोळे वजनाचे दागिने घेऊन दुचाकीहून पळून गेले, याबाबत बळीराम रामचंद्र इंदलकर वय ६९ वर्षे रा. बाबुराव नगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.