शिरूर येथील धारिवाल कुटुंबाकडून मानाचा चौथा गणपती असेलल्या श्री विठ्ठल मंदिर गणपतीला चांदीचा मुकुट अर्पण

9 Star News
0

 शिरूर येथील धारिवाल कुटुंबाकडून मानाचा चौथा गणपती असेलल्या श्री विठ्ठल मंदिर गणपतीला चांदीचा मुकुट अर्पण


शिरूर ( प्रतिनिधी ) 

       शिरूर शहरातील मानाचा चौथा गणपती असेलल्या श्री विठ्ठल मंदिर गणपती (कुंभारआळी) येथील गणपतीची प्राणप्रतिष्ठा प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या हस्ते विधीपूर्वक पार पडलीतर धारिवाल कुटुंबाकडून पाच किलो वजनाचा चांदीचा मुकुट गणपतीला अर्पण करण्यात आला.

                         शिरूर शहरातील मानाचा चौथा गणपती असेलल्या श्री विठ्ठल मंदिर गणपती येथील गणपतीची सुरेख मूर्ती घेऊन मूर्तीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीत आणण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व त्यांचे सुपुत्र आदित्य धारिवाल, माजी आमदार अशोक पवार, नगरसेवक मुज्जफर कुरेशी, हाफिज बागवान, पोपट जामदार, किरण पठारे, बाळासाहेब जामदार, एजाज बागवान, विजय शिर्के, संतोष शिंदे, दत्तात्रय काळे, संतोष जामदार, संभाजी जामदार, बाबुराव जामदार, राजकुमार जामदार, वसीम शहा, नितीन जामदार, अमित शिर्के, प्रशांत आतकर, रोहन जामदार, विशाल भावटणकर, पप्पू शिर्के, मयूर जामदार, शरद जामदार, विक्रम जामदार, नितीन शिर्के, नरेंद्र कडूस्कर, कुणाल क्षीरसागर, चरण जामदार, निलेश कुंभार यांसह आदी नागरिक, पदाधिकारी व महिला उपस्थित होते. 

    यावेळी आदित्य धारिवाल यांनी मुकुट हातात घेत उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व माजी आमदार अशोक पवार यांच्यासह मिरवणुकीत सहभागी झाले, सदर मिरवणुकीस नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असल्याने यावेळी परिसरातील वातावरणात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात दुमदुमून निघाले, यावेळी बोलताना गणपती उत्सव हा शिरूरकरांचा अविभाज्य घटक असून आमच्या कुटुंबाचीही गणरायावर मोठी श्रद्धा असून ती परंपरा आम्हाला जपायची आहे असल्याचे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी सांगितले, 

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय शिर्के यांनी केले तर प्रास्ताविक योगेश जामदार यांनी केले आणि शंकर जामदार यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!