गणेश विक्री स्टॉल परिसरात वाहतूक कोंडीवर शिरूर पोलिसांचे यशस्वी नियंत्रण यशस्वी
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील गणेश विक्री स्टॉल परिसरात यंदा गणेशोत्सवाच्या आगमनाच्या दिवशी वाहतूक कोंडी न होता सुरळीत नियोजनबद्ध व्यवस्था झाली. शिरूर पोलीस स्टेशन व शिरूर नगर परिषदेच्या संयुक्त नियोजनामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
दरवर्षीप्रमाणे गणेश विक्री स्टॉलजवळ व शिरूर रयत शाळा मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. परंतु यंदा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, पोलिस अंमलदार सचिन भाई, पोलिस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलिस आणि नगर परिषदेचे कर्मचारी रवींद्र जाधव बाळासाहेब शेंडगे, पोलिस अंमलदार वीरेंद्र सुंबे, पोलिस अंमलदार बाळकृष्ण वाडेकर, महिला पोलीस सपकाळ, नगर परिषदेचे कर्मचारी रवींद्र जाधव बाळासाहेब शेंडगे,यांनी योग्य नियोजन केले. रयत शाळा मैदान येथे चारचाकी वाहनांची तर सेंटर शाळा परिसरात दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली.
याशिवाय फळ विक्रेते, डेकोरेशन साहित्य विक्रेते व फुल विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली. परिसरात एकेरी वाहतूक राबविण्यात आली तसेच योग्य ठिकाणी बॅरीकेट्स उभारून गर्दी नियंत्रणात ठेवण्यात आली.
गणेश विक्री स्टॉलजवळील वाहतूक कोंडी हा कायमस्वरूपी डोकेदुखीचा विषय मानला जात होता. मात्र यंदा पोलिसांनी व नगर परिषदेने केलेल्या या नियोजनामुळे भाविकांनी गणेशमूर्ती आपल्या घरी व मंडळांमध्ये नेण्यात कुठलाही अडथळा जाणवला नाही.
"गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून योग्य नियोजन केले. पार्किंग, वाहतूक नियंत्रण आणि बॅरीगेट्स यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली," असे शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.