शिरूर प्रतिनिधी
बोल बजरंग बली की जय चा जयघोष करत शिरूर येथील सीताबाई थिटे डी फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फोडली शिरूरची मानाची महिला दहीहंडी आणि एकच जल्लोष करण्यात आला.
यशस्विन वेल्फेअर फाउंडेशन व स्वराज्य रक्षक फाउंडेशन शिरूर यांच्यावतीने महाराष्ट्रात महिलांनी महिलांसाठी घेतलेल्या दहीहंडीचे तिसरे वर्ष होते.
या महिला दहीहंडी उत्सवात यावेळी सिताबाई थिटे डी फाम कॉलेज शिरूर, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव,सिताबाई थिटे बी फाम कॉलेज शिरूर,आय टी के बी कराटे क्लास हे संघ सहभागी झाले होते.
या महिला दही हंडी हंडी कार्यक्रमाची सुरुवात शिरूर हवेली चे आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनीषाताई कटके यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून,दीप प्रज्वलित करून व नारळ फोडून करण्यात आली.
मनीषा काकी कटके यांनी कार्यक्रमाच्या वेळी ,आयोजकांचे विशेष आभार मानत यापुढे ही या महिला दही हंडीत जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे व आपल्या शिरूर तालुक्याचे नाव मोठे करावे ,आपण महिला ही कोणत्याही खेळात माघे नाही हे दाखवून द्यावे.
यावेळी आमदार माऊली कटके यांच्या पत्नी कटके, माजी नगरसेविका हिराबाई ढोबळे,प्राजक्ता ढोबळे,शोभना पाचंगे,मनीषा कालेवर,स्नेहलता यादव,दहीहंडीच्या आयोजक संपादक शोभा परदेशी, यशस्वीनी वेल्फेअरच्या सचिव नम्रता गवारी,सुवर्णा सोनवणे,ऋतिका झांबरे,साधना शितोळे,मीरा परदेशी,सुनीता कुरुंदळे, सागर दंडवते,चेतन साठे,योगेश जामदार,कैलास सातव, माजी सरपंच विठ्ठल घावटे ,पत्रकार मुकुंद ढोबळे उपस्थित होते.
या महिला कार्यक्रमा साठी शिरूर येथील रुबी हॉल हॉस्पिटलचे युनिट हेड मायकल पॉल व हॉस्पिटल ची ॲम्बुलन्स व त्यात डॉक्टर व नर्सिंग स्टाफ ही या हॉस्पिटलने उपलब्ध करून दिला.
या आलेल्या पाच टीमने दही हंडी ला मानवंदना देत कार्यक्रमाची सुरुवात केली व सीताबाई थिटे डी फार्मसी मुलींनी सलग दुसऱ्या वर्षी दही हंडी फोडून एकवीस हजार रुपयांच्या बक्षिसावर आपले नाव कोरले तर सहभागी संघांना व विजेता संघांना मानाची ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे पंच म्हणून अँड .काजल थोरात व अमृत झांबरे यांनी विशेष सहकार्य केले तर कार्यकर्माचे सूत्र संचालन संतोष झंजाड व किरण झांबरे यांनी केले.
या महिला दही हंडी चे आयोजन स्वराज्य रक्षक फाउंडेशन व पुणेग्रामीणच्या संपादक शोभा परदेशी व वेलफेअर फाऊडेशन नम्रता गवारे यांच्या वतीने करण्यात आले होते.