शिरुर दिनांक ( वार्ताहर )
ध्वजारोहण,सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा पुरस्कार तिरंगा रॅली पोलिस परेड यांच्यासह भारतीय स्वातंत्र्य दिन शिरुर शहर आणि परिसरात मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला यावेळी'भारत माता कि जय वंदे मातरम' च्या जयघोष यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाढलेला दिसून आला.
ध्वजरोहणाचा मुख्य शासकिय सोहळा शिरुर तहसिल कार्यालयाचा आवारात शिरूर च तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण तर शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी गटविकास आधिकारी महेश डोके , निवासी नायब तहसिलदार स्नेहा गिरगोसावी , महसूल नायब तहसिलदार प्रकाश मुसळे , संजय गांधी नायब तहसिलदार सुवर्णा खरमाटे , शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी प्रितम पाटील, माजी नगराध्यक्ष जाकिरखान पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, नामदेव घावटे, शरद कालेवार,सुनील जाधव, जयवंत साळुंके यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिरूर विद्याधम प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल शिरूर, शिरूर नगर परिषद उर्दू शाळा यांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर समूहगीत सादर करण्यात आली .
पंचायत समिती कार्यालयात गटविकास आधिकारी महेश डोके यांच्या हस्ते झेंडावंदन झाले . लोकजागृती चळवळीच्या वतीने शहरातील हुतात्मा स्मारकावर हस्ते झेंडावंदन करण्यात आले . शिरूर येथील जामा मशीद येथे ध्वजारोहण करण्यात आले.
शिरुर नगरपरिषद येथे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले . यावेळी पालिकेचे विविध विभागांचे विभागप्रमुख, शिरुर नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक आदी उपस्थित होते .
शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक दीपक करांडे यांच्या हस्ते ध्वजारोहणझाले
शिरुर नगरपरिषद शाळा क्रमांक -४ व ६ याठिकाणी शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळ प्रशासनधिकारी प यांच्या हस्ते झेंडावंदन झाले .
शिरूर नगर परिषद शाळा क्रमांक पाच येथे शिरूर शहर वकील सेलचे अध्यक्ष ॲड.रवींद्र खांडरे,माजी मुख्याध्यापक निंबाळकर गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
आयेशा बेगम उर्दू शाळा येथे ध्वजारोहन करण्यात आले . हलवाई चौक गणेश मित्र मंडळ येथे ज्येष्ठ सभासद सल्लागार मुथा यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले .
डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल, बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल, पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल,ज्ञानगंगा विश्वविद्यालय ,जीवन विकास मंदिर शाळेत ,चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात , विद्याधाम प्रशाला प्राथमिक शाळा,
विद्याधाम प्रशाला येथे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य राजेंद्र भटेवरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.न्यु इंग्लिश स्कूल रयत शाळा येथे
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधे सचिव अनिल ढोकले यांच्या हस्ते ध्वजावंदन झाले.
व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, सिताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयात ,शिरुर शहर भाजपाचा वतीने लाटेआळी येथे ध्वजारोहन करण्यात आले .
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाटेआळीतील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकात या सर्व ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
शिरूर नगर परिषदेच्या वतीने शिरूर शहरातील नगरपरिषद शाळा अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
कुंभार आळी येथे सिंदूर भारत -पाक यांच्या दरम्यान जे युद्ध झाले त्याला ऑपरेशन सिंदूर नाव दिले गेले. त्या ऑपरेशन सिंदूर ची सुरुवात करताना भारतातर्फे जो पहिला प्रतिहाल्ला करण्यात आला त्याचा पहिला गोळा शिरूर चे जवान राजेश गोपाळ यांच्या रेजिमेंट ने सोडला होता.त्या प्रसंगाच्या आठवणी सांगत असताना सर्व उपस्थित्यांच्या अंगावर शहारे आले.पहिल्या गोळ्याने कसा पाकिस्तान चा मुख्य लष्करी तळाचा अचूक वेध घेतला याचा रंजक किस्सा या वेळी त्यांनी बोलून दाखवला.
या वेळी बालवाडीच्या विध्यार्थ्यांना नितीन जामदार यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.