शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथे आजारी आजीला भेटण्यासाठी आलेल्या नातीने व नातजावयाने आजी झोपले आता फायदा घेत घरातील कपाटातील पाच लाख रुपये रॉकेल चोरून नेल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कमल दत्तु मलगुंडे (वय 60 रा. इंदीरानंगर शिरूर पेट्रोलपंप शेजारी शिरूर ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत राजु दिनकर कोळपे, शिवानी राजु कोळपे (दोन्ही रा मांडवगण फराटा ता. शिरूर जि पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक १० ऑगस्ट दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान मी कॅन्सर पीडित असल्याने माजी नात शिवानी व तिचा नवरा राजू कोळपे असे दोघेजण मला भेटायला इंदिरानगर येथे आली होते.मी आजारी असल्याने मला भेटणेसाठी आले. तेव्हा मी आजारी असल्याने बेडवर झोपलेले होते. तेव्हा माझी नातजावई नामे राजु दिनकर कोळपे, नाती शिवानी राजु कोळपे यांनी दोघानी माझे घरातील कपाटामधील रोख रक्कम पाच लाख रुपये माझे नकळत चोरीच्या उद्देशाने नेले व माझे सोबत बोलणे केले व चहा घेतला व ते मांडवगण येथे निघुन गेले. त्यांनतर दुसरे दिवशी नगरला उपचाराकामी जायचे होते. म्हणुन मी कपाट उघडुन पाहीले असता त्या कपाटात असलेले रोख 5 लाख रुपये दिसुन आले नाही त्यामुळे मी नातजावई राजु कोळपे, नात शिवानी कोळपे यांना फोन लावुन पैशाबाबत विचारले असता तुझा काय पुरावा आहे. तुझे पैसे घेतले नाही तुझे कडे आमचे 8 लाख रूपये आहेत. असे म्हणुन तु पैसे मागुन नको तुला मारून टाकीन अशी धमकी दिली.फिर्यादीवरून दोघा जनांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नाथासाहेब जगताप करीत आहे.