शिरूर तालुक्यात कला केंद्राला महिलांचा विरोधवाजेवाडी होणाऱ्या कला केंद्राला महिलांचा कडाडून विरोध
शिरूर
( प्रतिनिधी ) वाजेवाडी ता. शिरूर येथे नव्याने होणाऱ्या सांस्कृतिक कलाकेंद्राला परवानगीसाठी अर्ज आल्यानंतर आज महिला सभेमध्ये महिलांनी कलाकेंद्राला कडाडून विरोध करत मंजुरी न देण्याबाबत ठराव करण्यात आला आहे.
वाजे वाडी ता शिरूर येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महिलेने एका स्थानिक इसमाची जागा भाडेतत्त्वावर घेऊन सदर ठिकाणी कला केंद्र स्थापन करण्याबाबत ग्रामपंचायतकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे आज नुकतीच वाजेवाडी ग्रामपंचायत सभागृहात महिलांची महिला सभा ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली असताना यावेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सदर कला केंद्र परवानगी बाबतच्या अर्जाचे वाचन केले करताच महिला आक्रमक झाल्या त्यांनी सदर कलाकेंद्राला कडाडून विरोध करत ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडले तर सर्व महिलांच्या एकजुटीने सदर अर्ज नामंजूर करण्यात आला असून कलाकेंद्राला विरोध दर्शवत कला केंद्राची परवानगी देखील नामंजूर करण्यात आली आहे,
स्वतंत्र चौकट -
वाजेवाडी हत्ती मध्ये कलाकेंद्रासाठी परवानगी अर्ज आल्यानंतर आज झालेल्या महिलांच्या सभेत सदर अर्ज सर्वानुमते ना मंजूर करण्यात आलेला असून ग्रामपंचायत ची ग्रामसभा गुरुवारी आयोजित करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी मंगल लगड यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ - वाजेवाडी ता. शिरूर येथे कला केंद्रास विरोध दर्शवताना आक्रमक महिला.