युवा उद्योजक संतोष थेऊरकर यांच्या वाढदिवसा निमित्त मित्र परिवाराने गरजवंतांना धान्य वाटपाचे आयोजन केले व या वेळी १०० धान्य किट चे वाटप केले

9 Star News
0

 संतोष थेऊरकर यांच्या वाढदिवसा निमित्त मित्र परिवाराने गरजवंतांना धान्य वाटपाचे आयोजन केले व या वेळी १०० धान्य किट चे वाटप केले 


शिरूर प्रतिनिधी 

        शिरूर शहरातील सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे व गोरगरिबांना अडीअडचणींना मदत करणारं एक समाजसेवेचा वसा घेतलेला उमदा तरुण म्हणजे युवा उद्योजक संतोष थेऊरकर असून त्याच्या या कार्याचा गौरव करावा तेवढा थोडा असल्याचे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे यांनी व्यक्त करून सामाजिक कार्याबरोबर त्यांना राजकारणात ही चांगला वाव असल्याचे त्यांनी सांगितले.

         शिरूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संतोष थेऊरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व एक हात मदतीचा अंतर्गत समाजातील गरजू शंभर कुटुंबांना किराणा कीटचे वाटप कार्यक्रमांमध्ये बोलत होते. 

         यावेळी राहुल पाचर्णे, मेजर प्रभाकर थेउरकर माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक अशोकदादा पवार, अँड .अनिल वाखारे , उद्योजक नवनाथ फरगडे, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग करीखिले, व्यापारी संघाचे ज्येष्ठ सल्लागार मूलचंद सुराणा, मदनशेठ पिपडा , या वेळी स्टेट बँक कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने माजी मुख्याध्यापक संजय जी लुटे, योगेश पवार , युवा नेते सागर नरवडे, डॉ अमित गायकवाड , शहाणे मित्र परिवार , हर्षद देसाई विशाल झावरे व दादा भुजबाळ प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शेखर दळवी आढाव सर, विराज आढाव आशिष शिंदे निलेश कोळपकर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच जोशीवाडी येथील पै. राजू भोसले, जेष्ट शl सारोळकर साहेब, प्रमोद जी गायकवाड , वसीम शेख , गणेश गांगड, पै अविनाश ढवळे , निखिल अढाव अनिल अंभोरे ,अक्षय गायकवाड , अशोक चक्कर , सुनील शिंदे , पडोळे साहेब , कळमकर मेजर , पोळ साहेब, ढवळे साहेब उपस्थित होते.


स्टेट बँक कॉलोनी , विठ्ठल नगर , जोशीवाडी, गोळेगाव रोड , तर्दोबाचीवादी, मोठी तालिम मित्र परिवार या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्या साठी उपस्थित होते . 

        संतोष थेऊरकर यांच्या कार्याचा हा सन्मान आहे. राजकारणातील समाजकारणातील एक प्रामाणिक एकनिष्ठ नेता नव्हे कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख असल्याचे माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी यांनी सांगितले.

 समाजातील गोरगरीब नागरिकांना नेहमी त्यांनी मदतीचा हात दिला असून आपल्या भागातील नागरिकांना ड्रेनेज लाईन, रस्ते, विद्युत दिवे यासह त्यांच्या अडीअडचणीला उभा राहणारा एक सामजिक कार्यकर्ता, भाऊ, मुलगा म्हणून त्याच्याकडे या परिसरातील नागरिक पाहत असल्याचे गौरव उद्गार माजी नगरसेवक अशोक पवार यांनी व्यक्त केले.

     यावेळी नवनाथ फरगडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक तर सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले. आभार युवा नेते उद्योजक संतोष थेऊरकर यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!