कवठे यमाई ता.शिरूर अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू मृतांमध्ये पाच वर्षाचा लहानग्याचा समावेश
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील कवठे यमाई बंटी धाब्याजवळ अष्टविनायक महामार्गावर दुधाच्या टेंपोची व वाहतूक करणारा टेम्पो ला मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दुधाच्या टेंपो मधील एकाच कुटुंबातील बाप लेक आजी तिघांचा मृत्यू झाला आहे.हा अपघात रविवारी १७ ऑगस्ट पहाटेच्या सुमारास झाला आहे.
६८ वर्षीय आई,३८ वर्षीय मुलगा आणि ५ वर्षीय नातू असा या मृत्यूमध्ये तिघांचा समावेश आहे.
ज्ञानेश्वर मकाजी वाजे (३८ वर्षे), शांताबाई मकाजी वाजे (६८ वर्षे) व मुलगा युवांश ज्ञानेश्वर वाजे (५ वर्षे) असे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा या मृतांमध्ये समावेश आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे अष्टविनायक महामार्गावरील शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे बंटी दाब्याजवळ मुंबईहून निघोज कडे येणारा कन्हैया कंपनी दुधाचा टेम्पो क्रमांक क्रमांक एम एच १६ सीडी ९८१९ हा कवठे यमाई जवळ आले असता अष्टविनायक महामार्गावर टेंपो क्रमांक एम एच ४२ बी ८८६६ टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात दुधाच्या टेम्पोचा किन्नर साईट कडील भाग पूर्णपणे उध्वस्त झाल्याने त्या ठिकाणी बसलेले एकाच कुटूंबातील आई मुलगा आणि नातू अशा तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय,आई शांताबाई वाजे,मुलगा ज्ञानेश्वर वाजे,नातू युवांश वाजे अशा एकाच कुटुंबातील तीन जणांचा या अपघातात दुर्दैवीरीत्या मृत्यू झालाय, धडक एवढी भीषण होती की दुधाचा टेम्पो हा मालवाहतूक टेम्पो त घुसला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढले. मात्र लहानगा युवांश जागीच ठार झाला, तर गंभीर जखमी शांताबाई व ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टँकर चालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातातील मृत्यू मधील तिघेही मुंबईहून वडनेर या आपल्या गावी येत असताना हा अपघात झाला आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील टपाल टाकळी आजी आऊट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहे