शिरूर चां.ता.बोरा महाविद्यालयात इंट्रोडक्शन टू कॅलिग्राफी कार्यशाळा उत्साहात
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती आणि भाषा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने “इंट्रोडक्शन टू कॅलिग्राफी : आर्ट ऑफ ब्युटीफुल रायटिंग” ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.
नाशिक येथील तज्ञ सुलेखनकार पूजा निलेश यांनी प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना सुलेखनाचे बारकावे प्रत्यक्ष दाखवून दिले.
या कार्यशाळेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता आणि क्रियात्मक कौशल्यांचा विकास व्हावा, हा कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश असल्याचे कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले.
कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली, तर उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
कार्यशाळेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व प्राध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.