गोपीचंद पडळकरच्या अपशब्दांना शिरूर शिवसेनेचा जळजळीत प्रत्युत्तर! शिवसैनिकांचं पडळकरच्या प्रतिमेला ‘जोडो मारो’ आंदोलन...भाजप वाचाळवीरांना चपराक
शिरूर, प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे वादग्रस्त आणि वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी वापरलेल्या अपशब्दांविरोधात शिरूर तालुक्यात तीव्र संताप उसळला असून, तालुक्यातील शिवसैनिकांनी याचा तीव्र निषेध नोंदवला. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडो मारून संतप्त शिवसैनिकांनी ‘जोडो मारो आंदोलन’ करत आपला रोष व्यक्त केला.
शिवसेना उपनेते आमदार सचिन भाऊ अहिर, रविंद्रजी मिर्लेकर, जिल्हाप्रमुख अशोक भाऊ खांडेभराड यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.
"शिवसेना पक्षप्रमुखा विरोधात बोलणाऱ्यांची जीभ आम्ही छाटल्यावाचून राहणार नाही," असा थेट इशारा शिरूर तालुक्यातील शिवसैनिकांनी दिला. "गोपी पडळकरसारख्या नादान माणसाला आता शिवसैनिक रस्त्यावर धडा शिकवतील," सूर आंदोलकांच्या घोषणांमधून स्पष्ट दिसत होता.
या आंदोलनात उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील, तालुका सल्लागार संतोष काळे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशालबापू गाडे, महिला आघाडीच्या संगिताताई शिंदे, ग्राहक संरक्षण सेलचे कैलास पवार, माजी चेअरमन तात्या धावडे, माजी सरपंच बंडूसेठ पवार, व्हा. चेअरमन साहेबराव कारंडे, अजित पवार, दौलत पवार, प्रताप चव्हाण, सुनिल चव्हाण, संतोष चौधरी, संदीप पवार, सुनिल खळदकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.