शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामावरून मुक्त करण्याची मागणी

9 Star News
0

 


शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामावरून मुक्त करण्याची मागणी 


शिरूर, प्रतिनिधी 

      शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) या अशैक्षणिक कामावरून मुक्त करण्याची मागणी शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वयक संघटनेच्या वतीने केली आहे. 

       याबाबतचे निवेदन शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर यांना देण्यात आले आहे.

         यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे ,शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक अध्यक्ष संतोष गावडे ,तालुका संघाचे शिक्षक नेते संतोष शेवाळे ,सरचिटणीस आपासाहेब रसाळ ,जिल्हा सहसरचिटणीस सोमनाथ गायकवाड ,प्रसिद्धी प्रमुख संतोष जाधव ,संजय वाळके ,माऊली कुरुंदळे ,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबनराव म्हाळसकर ,शिक्षक समितीचे अनिल जगदाळे ,पदवीधर संघटनेचे अध्यक्ष कल्याण कोकाटे ,सचिन खेडकर ,संदीप थोरात आणि गाव पातळीवर बीएलओ काम करणारे शिक्षक बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते* .सर्व शिक्षक बांधवांना आश्वासित करताना तहसीलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले ,निश्चितच या निवेदनाचा सकारात्मक विचार करून तातडीने तपासून उचित कार्यवाही केली जाईल .तसा शेराही त्यांनी संघटनांच्या निवेदनावर दिलेला आहे .

      निवेदनात म्हटले आहे की, शालेय शिक्षणास प्राधान्य देणे आवश्यक असून, शिक्षकांकडून बीएलओसारखी अशैक्षणिक जबाबदारी घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होतो. शासन निर्णय नुसार शिक्षणाशी संबंधित नसलेली कामे शिक्षकांकडून घेणे टाळण्याच्या सूचना आहेत. तरीही, शिरूर तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामाचे आदेश देण्यात आले आहेत.

    या पार्श्वभूमीवर, शिक्षक संघटनांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले असून, सदरचे आदेश रद्द करून इतर यंत्रणेकडून बीएलओची जबाबदारी पार पाडावी अशी मागणी करण्यात आली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!