शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील जबरी चोऱ्यांचे प्रमाण टाळण्यासाठी ग्राम सुरक्षा दल व यंत्रणा कार्यान्वित करण्यात याव्यात
शिरूर प्रतिनिधी
शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील ५२ गावात ग्रामसुरक्षा दल व ग्रामसुरक्षा यंत्रणा बरोबर सी सी टीव्ही लावल्यास गावातील जबरी चोरी किंवा दरोडा यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगून, आजच्या बैठकीला सांगून सुद्धा 40% पोलीस पाटील तर 51 गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पैकी कोणी हजर राहिले नसल्याने ढोले यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
शिरूर तालुक्यातील आंबळे या गावात एकाच महिन्यात दोन घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकून महिला पुरुषांना मारहाण करून लुटमार केली यासंदर्भात उपाय योजना करीता शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस पाटील व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले बोलत होते.
यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी संदेश केंदळे म्हणाले की आपापल्या भागात ग्रामपंचायत परिसरामध्ये सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. तसेच ग्राम सुरक्षा दल व ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पोलीसपाटील व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घ्यावा असेही सांगितले.
शिरूर तालुक्यातील आंबळे या गावात महिन्यात दोन वेळा जबरी चोरी व दरोड्यासारखा प्रकार घडला असून हे दोन्ही प्रकार गावापासून लांब असलेल्या घरांवर झाला आहे त्यामुळे चोरटे हे अशी घर शोधून शा प्रकारे जबर्या चोऱ्या करत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांबरोबर सदर ग्रामपंचायत पोलीस पाटील यांनी समन्वय साधून आपापल्या गावातील ग्राम सुरक्षा दल व ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी तर ग्राम संरक्षण यंत्रणा सुरू करण्यासाठी शासनाच्या निधीचा वाट न बघता गावातील एखादा दानशूर व्यक्ती किंवा वर्गणी द्वारे त्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असा सल्लाही पोलीस पाटील व सरपंच यांना दिला आहे. तर ही बैठक आपल्या गावातील सुरक्षितेसाठी आहे परंतु यासाठी सरपंच उपसरपंच यांना पत्राद्वारे उपस्थित राहण्याची विनंती केली होती परंतु ते उपस्थित राहिले नाही याबद्दल ढोले यांनी नाराजी व्यक्त करताना आपले गाव सुरक्षित राहावे आपल्या गावातील नागरिकांची सुरक्षितता ही पोलिसांबरोबर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या लोकसेवकांची सुद्धा आहे तर चाळीस टक्के पोलीस पाटील उपस्थित न राहिल्याने ही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर शिरूर तालुक्यातील शिक्रापूर भागामध्ये ग्रामसुरक्षा दल व ग्राम सुरक्षा यंत्रणा कारवाई नाहीत आहे त्यामुळे या भागात चोरींच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे त्यांनी सांगून ग्राम सुरक्षा दलाचा किंवा यंत्रणेचा गैरवापर झाल्यास संबंधित यावर गुन्हे दाखल करण्यात येईल असेही यावे ढोले सांगितले.
११२ नंबर पोलिस यंत्रणेचा वापर करावा तसेच शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील आऊट पोस्ट पोलीस चौकीमधील अधिकारी व पोलिसांनी आपल्या भागातील गावांच्या मध्ये ग्राम सुरक्षा दल व ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यासाठी बैठकी घ्याव्यात तसेच एक गाव एक पोलिस याबाबत समन्वय साधून पोलिस देण्यात येतील असे ही ढोले यांनी सांगितले.
यावेळी टाकळी हाजीचे सरपंच, गुनाट गावचे पोलीस पाटील, आंबळे गावचे पोलीस पाटील यांनी अडचणी व माहिती सांगितली.