कारेगाव येथे चार बांगलादेशी नागरिकांचा विरोधात बेकायदा वास्तव्य केल्या संदर्भात गुन्हा दाखल
शिरुर, प्रतिनिधी
कारेगाव , ता शिरुर येथे गेल्या दोनवर्षापासून अवैद्यरित्या राहत असलेल्या चार बांगलादेशींना दहशतवाद विरोधी पथक व रांजणगाव पोलिसांनी पकडले असल्याची माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिले आहे.
कमरोल रमजान शेख (वय 32 , गाव दामोदर ठाणा फुलताला जिल्हा खोलना बांगलादेश),अकलस मजेत शेख (वय 39 गाव उसला ठाणा पोटालीपाडा, जिल्हा गोपालगंज,बांगलादेश), मोहम्मद अब्दुल्ला मलिक (वय 35 धर्म मुस्लिम गाव मादपपाशा तालुका कालिया जिल्हा नोडाइल बांगलादेश), जाहिद अबूबकर शेख (वय 30 पिडोली तालुका कालिया जिल्हा नोडाइल बांगलादेश) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
याबाबत मोसिन बशीर शेख ( पोलीस कॉन्स्टेबल दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीण यांच्याकडील पोलीस अंमलदार मोसीन शेख यांना गोपनीय बातमीदारात मार्फत माहिती मिळाली होती की कारेगाव, तालुका शिरूर येथे काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत आहेत . या बातमीच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलिस यांच्या संयुक्तपणे पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये वरील चार नागरिकांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे त्यांनी सांगितले.
अटक केलेले बांगलादेशी नागरिक घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून बनावट भारताचे आधार कार्ड धारण करून अनाधिकृतपणे कारेगाव येथे मागील दोन वर्षापासून वास्तव्य करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे . त्यांच्या विरोधात भा .न्या स .का कलम – 336(2)(3),338,340(2)पासपोर्ट अधिनियम कलम 3,6 पारपत्र अधिनियम 1950 कलम 3(a)
परकीय नागरिक आदेश 1948 कलम 14 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल , अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , शिरूर उपविभागीय पोलिस आधिकारी प्रशांत ढोले , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व दहशतवाद विरोधी शाखेचे प्रकाश पवार, , त्याचप्रमाण दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलीस स्टेशन कडील पीएसआय अविनाश थोरात, विशाल गव्हाणे, दत्तात्रय शिंदे,विशाल भोरडे, रवींद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मोसीन शेख, ओमकार शिंदे, योगेश गुंड, संतोष साळुंखे, आकाश सवाने यांचे पथकाने केली
पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
.