छत्रपती संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिरूरशहरात निषेध
शिरूर प्रतिनिधी
छत्रपती संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिरूर शहरातील विविध संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली .
याबाबतचे निवेदन शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना दिले.
यावेळी काहीवेळ विविध संघटनांच्या वतीने निदर्शने ही करण्यात आली. यावेळी न्याय द्या न्याय द्या देवेंद्र फडणवीस न्याय द्या न्याय द्या उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे न्याय द्या. पोलिस अधिकारी न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंड अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,माजी उपसरपंच संभाजी कर्डिले,शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे संभाजी ब्रिगेडचे सुदाम कोलते, सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले, रूपाली बोर्डे,राधा घेगडे, समस्त सकल मराठा समाज संघाचे विश्वस्त रामभाऊ इंगळे,संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर वाखारे, प्रा. चंद्रकांत धापटे माजी नगरसेवक विनोद भालेराव काँग्रेस आय चे अजीम सय्यद,माजी नगरसेवक मंगेश खांडरे,मोहम्मद हुसेन पटेल, संजय बांडे,बबन गायकवाड, आप्पासाहेब वरपे,यासह विविध संस्था संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रवींद्र धनक म्हणाले की हल्ल्याची झालेली घटना दुर्दैवी व निषेधार्थ आहे. या घटनेच्या मागील व्यक्तींचा शोध घेऊन शासनाने त्यावर कडक कारवाई कारवाई करावी.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, विनोद भालेराव, राणी कर्डिले,संजय बारवकर आप्पा साहेब वर्पे, भास्कर पुंड यांची भाषणे झाली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेला भ्याड हल्ला निषेधार्ह असून हल्ल्याच्या सूत्रधारावर कारवाई करावी. विचारांची लढाई विचाराने करण्याची आपली उज्ज्वल परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उज्ज्वल परंपरेतून आणि अनेक संतांच्या विचारातून महाराष्ट्र मध्ये सहभागी बंधू भावाचा महाराष्ट्र धर्म तसेच सुधारणावादी नेतृत्वाची जडणघडण झाली आहे.
आम्ही सर्व या अविवेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. असे निवेदनात म्हटले असून हल्ल्याच्या सूत्रधार अद्याप मोकाट आहे.या हल्लेखोरांवर कडक कारवाई कारवाई करावी.