आषाढी एकादशी निमित्ताने ओन्ली वूमन जीमच्या वतीने फराळ वाटप
शिरूर प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त शिरूर येथील ओन्ली वुमन्स जीम तसेच भाजप महिला आघाडी शिरूर शहराच्या वतीने भाविकांना फराळ(खिचडी) व केळीचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री दत्त व श्री विठ्ठल रुक्मिणीमाता यांची महाआरती करण्यात आली. जुनी शिरूर नगरपरिषद हुतात्मा स्तंभाजवळ दत्त मंदिर येथे फराळ व केळीचे वाटप करण्यात आले
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुलदादा पाचर्णे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुजाता पाटील,समाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे,मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉ.वैशाली साखरे, डॉ.संतोष पोटे,आदिशक्ती महिला मंडळाच्या शशिकला काळे,भाजपच्या सृष्टी करंजुले वात्सल्य सिंधू फाउंडेशन उषाताई वाखारे , अध्यात्मिक आघाडीचे प्रमोद जोशी नीलमधू शर्मा , भाजपाच्या उपाध्यक्षा सुष्ट्री करंजुले विजयलक्ष्मी उपाध्याय, जयश्री हारदे ,कविता बोरगे, मीरा परदेशी ,सना शेख ,सुशीला गोसावी, हरीश शर्मा ,श्याम पाटील सुवर्णा चिपाडे, गणेश चिपाडे , पत्रकार उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत ओन्ली वुमन जीम व भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी केले तर आभार शिवसेनेच्या सुजाता पाटील यांनी मानले.
यावेळी ओन्ली वूमन जीमच्या संस्थापिका प्रिया बिरादार म्हणाल्या आषाढी एकादशी ही भक्ती, सेवाभाव आणि एकतेचे प्रतीक आहे. या दिवशी भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे हेच आमच्यासाठी खरे पुण्य आहे.”
कुंभाआळी येथे,विठ्ठल रुक्मणी मंदिरामध्ये,कुंभाआळी गणेश मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले,