चिमुकल्यांच्या पालखीच्या रिंगणात रंगली आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलची आषाढी वारी

9 Star News
0

 पालखीच्या रिंगणात रंगली आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलची आषाढी वारी


शिरूर (प्रतिनिधी) 

         टाळ मृदंगाचा गजर.... हातात भगवी पताका..विठ्ठल विठ्ठल नामाचा चा गजर.... चिमुकल्यांनी केलेले गोल रिंगण आणि ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखीची जाणीव करून देणारा क्षण आणि हा क्षण पाहून विठ्ठलरूपी वरुणराजा ही बरसला व चिमुकल्यांना आशीर्वाद देऊन गेला साक्षात पंढरपुराचा विठ्ठल भेटल्याचा आनंद चिमुकल्यांसह शिरूर येथील आर एम डी स्कूल या शाळेच्या शिक्षक वर्गालाही झाला आणि विठ्ठलविठ्ठल नामाची शाळा भरली हे गीत गाऊन...विठ्ठल भक्ती मध्ये चिमुकले नाहून गेले...

       आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूरच्या प्रांगणात चिमुकल्या वारकऱ्यांच्या उत्साहात रंगलेला पालखी सोहळा पाहून शाळेच्या आवार भक्तिमय वातावरणात रंगून गेला होता.

        पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात सहभागी होत दिंडी, टाळ- मृदंगाच्या गजरात व "विठ्ठल-विठ्ठल"च्या जयघोषात साजरा केलेला पालखी उत्सव उपस्थितांचे मन जिंकून गेला. 

       या दिंडीत व रिंगण सोहळ्यात शिक्षक, पालक आणि शालेय समिती सदस्यांनी रिंगणात सामील होत आनंद लुटला.

     कार्यक्रमात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी "विठ्ठल नामाची शाळा भरली" हे गीत गाऊन वातावरण भक्तिमय केले, तर तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या सुंदर उपक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष योगदान होते.

या प्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, सदस्य धरमचंद फुलफगर, शिरीष बरमेचा, राजेंद्र भटेवरा, प्रशासकीय अधिकारी संजय देशपांडे, विद्याधामचे मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे आणि मुख्याध्यापिका अश्विनी घारू आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी सर्व चिमुकल्यांचे कौतुक करत, “आज तुमच्यामुळे आम्हालाही वारी अनुभवता आली,” असे सांगून समाधान व्यक्त केले.

पालखी, गजर आणि पावसाच्या सरींनी भारलेल्या या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये भक्तीची भावना रूजवली आणि त्यांच्यासोबत उपस्थितांनाही एक वेगळाच अध्यात्मिक अनुभव दिला.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!