शिक्रापुरात बनावट औषध निर्मितीचा पर्दाफाश

9 Star News
0

 शिक्रापुरात बनावट औषध निर्मितीचा पर्दाफाश



शिरूर, प्रतिनिधी
     शिक्रापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रतिमा फार्मास्युटिकल्स या औषध निर्मिती कंपनीवर केलेल्या कारवाईत ५५ लाख ६० हजारांचा ऐवज जप्त करत चौघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

मालक डॉ. प्रतीक पंडित पलांडे, रसायनशास्त्रज्ञ संदीप एस. क्षीरसागर, उत्पादक अधिकारी अंजनराव बी. शेळके व रमेश मोहनराव डोमले या चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मार्च २०२५ रोजी वानवडी येथील एका हॉस्पिटलमधून काही औषधांचे नमुने तपासणीसाठी घेऊन तपासणी केली असता सदर औषध बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त स. भा. दातीर, औषध निरीक्षक श्रुतिका जाधव, वि. वि. पाटील यांनी प्रतिमा फार्मास्युटिकल्समध्ये तपासणी केली असता औषध निर्मिती परवानगी नसल्याने निर्मिती थांबवण्याचे आदेश दिले. दरम्यान, पथकाने प्रतिमा फार्मास्युटिकल्स कंपनीसह त्यांनी वितरित केलेल्या ठिकाणचा ५५ लाख ६२ हजार ९३ रुपयांचा औषधसाठा व काही कागदपत्रे जप्त केली, त्यावेळी केलेल्या तपासणीत प्रतिमा फार्मास्युटिकल्सने मुंबई, पुणे येथे सदर बनावट औषध साठा विक्री केल्याचे समोर आले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रतिमा फार्मास्युटिकल्सला नोटीस बजावत सुनावणी घेतली असता कंपनीचे मालक डॉ. प्रतीक पलांडे यांनी नोटीसमधील मुद्दे मान्य असून कंपनीमधील कच्चा माल, बिल, उत्पादित मालांचे रेकॉर्ड गहाळ झाल्याचे म्हटले. दरम्यान, सदर कंपनीने तब्बल २१ औषधी पाठ विनापरवाना निर्मिती केल्याचे समोर आले, तर याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक मनोज नंदकुमार अय्या (वय ४५, रा. स्पाईन रोड, मोशी पुणे) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रतिमा फार्मास्युटिकल्सचे मालक डॉ. प्रतीक पंडित पलांडे, गुणवत्ता संदीप एस. क्षीरसागर, अंजनराव बी. शेळके व रमेश मोहनराव डोमले चौघे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!