शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: मोटेवाडी येथील डाळिंब चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील मोटेवाडी शिवारात शेतकऱ्याच्या शेतातून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या डाळिंबांची चोरी करणाऱ्या चोरट्याला शिरूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आकाश बशीर काळे (वय २५, रा. सोनसांगवी, ता. शिरूर) याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आकाश काळेने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
संदीप दौलत येलभर (रा. मोटेवाडी ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तपास पथकाने वेगाने तपास करत आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार,
दिनांक ७ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ०८ जुलै पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मोटेवाडी येथील संदीप दौलत येलभर यांच्या गट नंबर ६८६ मधील शेतातून १,४०० किलो वजनाचे डाळिंब एमएच १२ वायई ४०२३ या क्रमांकाच्या गाडीवरून अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. त्यात शिरूर तालुक्यातील शिंदोडी उरळगाव या ठिकाणी अशाच प्रकारे डाळिंब चोरी झाल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे डाळिंब चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक करून या चोरीचा तपास लावण्याचे आदेश शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तपास पथकाला दिले होते.
तपासादरम्यान, चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आकाश बशीर काळे (रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) याची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दिनांक १४ जुलै २०२५ रोजी पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी आकाश बशीर काळे हा रांजणगाव परिसरात आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, तसेच पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील या तपास पथकाने रांजणगाव परिसरात सापळा रचून आरोपी आकाश बशीर काळे याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आकाश काळेने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आरोपीला मा. न्यायालयात हजर केले असता, त्याला दिनांक १६ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विनोद मोरे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, तसेच पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड आणि अजय पाटील यांच्या पथकाने केली आहे.