राज्य सरकारला सध्या कोणाच्याही प्रश्नांकडे लक्ष्य द्यायला वेळ नसून, सत्ताधारी सत्तेतच मग्न - जयंत पाटील
शिरूर,प्रतिनिधी
राज्य सरकारला सध्या कोणाच्याही प्रश्नांकडे लक्ष्य द्यायला वेळ नसून, सत्ताधारी सत्तेतच मग्न आहेत.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच अधिक स्पष्टपणे सांगू शकतील असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सांगून न्हावरे फाटा ते कर्डे या रस्त्याचे भूसंपादन बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष पाटील हे पुण्याहून राहुरी, जि.अहिल्यानगरकडे येथे जात असताना सरदवाडी, ता.शिरुर येथे थांबले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी सरदवाडी चे ग्रामस्थ ऍड निनाद मगर ,ऍड उदय सरोदे,दत्तात्रय कुंडलिक,, तृप्ती सरोदे,गणेश सरोदे,विलास कर्डीले,योगेश कर्डीले, कृष्णा घावटे,विजय कुंडलिक,दिपक सरोदे, रोहन सरोदे, शंकर रासकर,, संदीप सरोदे,, आदि उपस्थित होते.
डिंभा उजव्या कालव्याचे कर्डेलवाडीपर्यंत काम पुर्ण झाले असून,उर्वरित काम पुर्ण करण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे पाटील यांना सांगताच याप्रश्नी आपण शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करु, असे आमदार जयंत पाटील म्हणाले.
रांजणगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक ३ मधील कर्डे परिसरातील कंपन्यासाठी वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरु असून, यामध्ये बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी ऍड मगर यांनी यावेळी केली.
न्हावरे फाटा ते कर्डे या रस्त्याचे भूसंपादन करुन त्याचा बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देवून रस्त्याचे रुंदीकरणाचे काम करावे,तसेच वीजवाहिनी भूमिगत करण्यास आम्हा शेतकऱ्यांची कोणतीही हरकत नसल्याचे ऍड निनाद मगर व ऍड उदय सरोदे यांनी सांगितले.वीज वाहिनी टाकण्याच्या कामी संबंधित विभागाचे अधिकारी आमचे म्हणणे ऐकून घेत नसल्याची तक्रार यावेळी ऍड मगर यांनी केली.
सरदवाडी, ता.शिरुर येथे मागण्याबाबत जयंत पाटील यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले.