शिरूर नगरपरिषदेची हद्दवाढ करून शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत व तरडोबावाडी ग्रामपंचायत या भागाचा समावेश करावा विधानसभेत मागणी - ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आमदार शिरूर
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर नगर परिषदेमध्ये शिरूर शहरात जवळचा शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत तरडोबावाडी ग्रामपंचायत हा भाग समाविष्ट करून शिरूर नगर परिषदेचे हद्द वाढ करावी अशी मागणी शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी विधानसभेमध्ये केली आहे.
सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा करताना आमदार माऊली कटके यांनी ही मागणी केली आहे.
शिरूर नगरपरिषद ही १८६८ मध्ये तयार झालेली नगरपरिषद आहे. ही ऐतिहासिक नगरपरिषद असून नगरपरिषदेच्या स्थापनेपासून नगरपरिषदेची हद्द वाढ झालेली नाही. नगरपरिषदेचे क्षेत्रफळ साडेसहा हजार चौरस स्क्वेअर मीटर एवढे आहे. शिरूर नगर परिषदेचा आजूबाजूचा म्हणजेच शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत रामलिंग रोड बाबुराव नगर व तरडोबावाडी ग्रामपंचायत हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. या भागाचा चांगला व व्यवस्थितपणे विकास होणे गरजेचे आहे. या दोन्ही ग्रामपंचायत मध्ये एकूण 40 ते 50 हजार लोकसंख्या झाली असून, शिरूर शहराच्या शेजारीत असल्याने या लोकांचे ये जा सारखी शिरूर शहरामध्ये आहे.
या भागाचा विकास व्यवस्थित होऊन त्यांना चांगल्या सोयी सुविधांसाठी हा सर्व भाग शिरूर नगर परिषदेमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी विधानसभेमध्ये आमदार माऊली कटके यांनी केली आहे.