विवाहितेच्या छळप्रकरणी पती सासू सासरे दीर चार जणांन विरोधात गुन्हा दाखल... शिरूर तालुक्यातील गुणाट येथीलप्रकार
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील गुणाट माहेरून पाच लाख रुपये आणावे व दिसायला सुंदर नाही असे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोमल भागुजी सरके (वय २४, रा. गुणाट, ता. शिरूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पती भागुजी लक्ष्मण सरके, सासरे लक्ष्मण बाबा सरके, सासू सुनिता लक्ष्मण सरके आणि दिर पाराजी लक्ष्मण सरके (सर्व रा. गुणाट, ता. शिरूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे
दिलेल्या फिर्यादी नुसार मार्च २०२३ ते २० जून २०२५ दरम्यान तिचे पती भागुजी लक्ष्मण सरके, सासरे लक्ष्मण बाबा सरके, सासू सुनिता लक्ष्मण सरके आणि दिर पाराजी लक्ष्मण सरके (सर्व रा. गुणाट, ता. शिरूर) यांनी वेळोवेळी तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच “तुला स्वयंपाक नीट येत नाही, तू दिसायलाही चांगली नाहीस” असे म्हणून तिला मानसिक छळ व पतीने हाताने मारहाण केल्याचेही फिर्यादी म्हंटले आहे.
फिर्यादीवरून पाच जणांवर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोरे करीत
आहे.