शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावाची गाव पण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद गटामध्ये या गावाचे दोन गटांमध्ये विभागणी करून कायम स्वरुपी गट असलेले गावचे इतर दोन जिल्हा परिषद गटात विभाजन केल्याने नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला असून याबाबत लक्ष घालण्याचे आव्हान विधान परिषदेचे सभापती यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी लक्षवेधी मध्ये केले आहे.
याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख पोपट शेलार यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन अहिर यांना याबाबत माहिती दिली होती त्यावरून विधानसभेत परिषदेमध्ये याबाबतलक्षवेधी प्रश्न मांडण्यात आला.आला आहे.
त्याबरोबर शिरूर तालुक्यातील गोरगरीब वृद्ध महिला पुरुषांसाठी असणारे श् ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनांचे मानधन२००० जानेवारी पासून मिळाले नसल्याचे त्यांनी यावेळी विधान परिषद सभापती यांना लक्षवेधी मध्ये सांगितले.
शिरूर तालुक्यातील शिरूर शहरानंतर मोठे असलेले गाव तळेगाव ढमढेरे हे असून या गावाच्या नावाने जिल्हापरिषद गटाची निर्मिती होत असते परंतु स्थानिक नेत्यांनी व राजकारण्यांनी या गावाची विभागणी दोन जिल्हा परिषदे गटामध्ये करून या गावाच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम राजकारण्यांनी केले आहे त्यामुळे तळेगाव ढमढेरे येथे मोठा असंतोष नागरिकांमध्ये असून सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याबाबत सचिन अहिर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ७ गट आणि पंचायत समितीचे १४ गण सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार केले आहेत. शिरूर तालुक्यात कवठे येमाई, न्हावरा, रांजणगाव गणपती, पावळ, सणसवाडी, शिक्रापूर आणि मांडवगण फराटा असे ७ जिल्हा परिषदेचे गट तयार करण्यात आले आहेत. गट आणि गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून तळेगाव ढमढेरे गट कधीही न विभागात कायम आहे. परंतु नवीन
आराखड्यानुसार तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट विसर्जित करण्यात आला असून तळेगाव ढमढेरे गावाचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. गट तर विसर्जित केलाच परंतु गावातील एक प्रभाग सणसवाडी गटाला जोडला असून, उर्वरित दोन ते सहा प्रभाग शिक्रापूर गटाला जोडले आहेत.
शिक्रापूर गटामध्ये शिक्रापूर, कासारी, निमगाव म्हाळुंगी, तळेगाव ढमढेरे, पारोडी, दहिवडी, करंजावणे, भांबर्डे, उरळगाव, टाकळी भीमा ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
सणसवाडी गटात कोरेगाव भीमा, वाडा पुनर्वसन, आपटी, वाढू बुद्रुक, डिंग्रजवाडी, वाजेवाडी, सणसवाडी धानोरे, दरेकरवाडी, विठ्ठलवाडी व तळेगाव ढमढेरे या गावांचा समावेश आहे
तळेगाव ढमढेरे गावामध्ये एकूण सहा प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक एक सणवाडीला जोडला आहे
तर प्रभाग क्रमांक दोन ते सहा शिक्रापूर गटात जोडले आहेत. एकसंध असलेले तळेगाव ढमढेरे गाव जिल्हा परिषद गटात मात्र दोन गटात जोडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमचे एकसंध असलेले गाव प्रशासनाने
विभागल्याने राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. तसेच तळेगाव ढमढेरे हा कायम जिल्हा परिषदेचा गट पूर्ण नामशेष केल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
तळेगाव ढमढेरे गावातून आतापर्यंत शिरूर तालुक्याचे राजकीय व सामाजिक नेतृत्व उदयास आले आहे. पंचायत समितीचे पहिले सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, जिल्हा परिषद सदस्य, सहकारी बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद, जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद, बाजार समितीचे सभापती व उपसभापतीची पदे, विविध राजकीय पक्षांची पदे आदी विविध क्षेत्रातील महत्त्वाची पदे तळेगाव ढमढेरे गावाला आतापर्यंत मिळालेली आहेत. अलीकडील काळात सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्थित्यंतर झाल्याने राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. अशातच विविध पक्षांची अध्यक्षपदे तळेगाव ढमढेरे गावातच देण्यात आलेली आहेत.