शिरूर पोलिसांकडून ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, ९ गुन्हे उघड साडे पाच लाखाचा ऐवज जप्त केला - संदेश केंजळे पोलिस निरीक्षक
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत डीपी चोरी करून पोलिसांबरोबर नागरी शेतकरी उद्योजक यांना महाकरात आला सामोरे जावे लागत होते परंतु या टोळीचा मुसक्या आवळण्यात आल्याने
नागरिक शेतकरी उद्योजक यांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
याप्रकरणी लवकुश कुमार उर्फ लवकुश राम प्रसाद गौतम (२२, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), मोहम्मद फरान खान उर्फ साहिल महम्मद असलम खान (२१, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) आणि मुजाहिर शौकत अली खान (२२, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, तिघे सध्या रा. चिखली, पुणे) या तिघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिरूर पोलीस स्टेशनचे हद्दीत आणि परिसरात डी.पी. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन स्थानिक नागरिक, शेतकरी आणि उद्योगांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत होते. या गंभीर समस्येची दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
शिरूर पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, डी.पी. चोरी करणारी ही टोळी चिखली, पुणे येथे येणार होती. या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण,हवालदार नाथसाहेब जगताप, अरुण उबाळे, शरद वारे, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, नीरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, रवींद्र आव्हाड, आणि अजय पाटील व चिखली पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार नानेकर, सावंत, भोर या पोलिस पथकाने चिखली येथे आरोपी येणार त्याठिकाणी सापळा रचला असता आरोपी एम.एच. ०१ ए.एच. ३९१२ क्रमांकाची काळ्या रंगाची मारुती सुझुकी एस एक्स ४ (SX4) कार मध्ये आले असता त्यांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले त्यात लवकुश कुमार उर्फ लवकुश राम प्रसाद गौतम (२२, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), मोहम्मद फरान खान उर्फ साहिल महम्मद असलम खान (२१, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) आणि मुजाहिर शौकत अली खान (२२, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) हे तिघे जण आढळले. हे सर्व सध्या यादवनगर, कुदळवाडी, चिखली, पुणे येथे राहत होते. त्यांची. चौकशी केली असता, या आरोपींनी राहुल गुप्ता आणि लवकुश मिश्रा (दोघेही फरार) यांच्या साथीने शिरूर परिसरात डी.पी. चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या गाडीच्या तपासणीत डी.पी. चोरीसाठी लागणारे साहित्यही पोलिसांना मिळाले. त्यांनी शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत वेगवगेळ्या ठिकाणी नऊ रोहित्र चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ३१५ किलो वजनाच्या, अडीच लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या कॉईल्स आणि ३ लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी एस एक्स ४ कार असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यांचे आणखी दोन साथीदार फरार आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अरुण उबाळे, शरद वारे, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, नीरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, रवींद्र आव्हाड, आणि अजय पाटील यांच्या पथकाने केली.