शिरूर शहर हे जातीय सलोखा ठेवून धार्मिक उत्सव व सण साजरे करून राज्यात आदर्श निर्माण करणारे शहर - प्रशांत ढोले शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी

9 Star News
0

 शिरूर शहर हे जातीय सलोखा ठेवून धार्मिक उत्सव व सण साजरे करून राज्यात आदर्श निर्माण करणारे शहर - प्रशांत ढोले शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी 

हलवाई चौक गणेश मंडळ गणराया अवार्ड 2024 चाप्रथम क्रमांकाचा मानकरी


शिरूर प्रतिनिधी 

          शिरूर शहर ऐतिहासिक शहर असून,जातीय सलोखा राखणारे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आदर्श घेणारे शहर असल्याचे गौरव उदगार शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले पाटील यांनी व्यक्त करून येणारा गणेशोत्सव डीजे मुक्त करण्यासाठी शिरूर तालुक्यातील सर्वात गणेश मंडळांनी सहकार्य करावे असे आव्हानही केले. तर शहरातील हलवाई चौक गणेश मंडळाला गणराया अवार्ड 2024 प्रथम क्रमांकाची पारितोषिक देण्यात आले.      

     शिरूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने देण्यात येणारा गणराया अवॉर्ड 2024 याचे बक्षीस समारंभ व गणेश उत्सवानिमित्त आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले बोलत होते. 

          यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, गणराया अवॉर्ड स्पर्धेचे परीक्षक रवींद्र सानप, प्रा . सतिश धुमाळ प्रा. विलास आंबेकर, प्रा. चंद्रकांत धापटे, डॉ. रविन बोरा, अँड . सुप्रिया साकोरे उपस्थित होते.

          येणारा 2025 गणेशोत्सव हा शांततेत व डीजे मुक्त कसा होईल याकडे गणेश मंडळांनी लक्ष देऊन पोलीस यंत्रणा सहकार्य करावे, तसेच शिरूर शहराची व येथील गणेश मंडळे कुठलाही धार्मिक सण व धार्मिक उत्सव असू द्या अतिशय शांतपणे व सामाजिक सलोखा ठेवून सर्वांनी एकत्र येऊन साजरे करतात तर यावेळेस पोलिसांनाही सहकार्य करून हे उत्सव साजरे केले जातात असा आदर्श शहर म्हणून शिरूर शहराची ओळख निर्माण झाली आहे हे कौतुकास्पद असल्याचे ढोले म्हणाले. 

        गणेश उत्सव हा सर्व गणेश मंडळांनी एकत्रित येऊन साजरा करून सामाजिक विषय व सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी नेहमीप्रमाणे प्रयत्न करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.

      गणराया आवड 2024 चा प्रथम क्रमांक हलवाई गणेश मित्र मंडळ हलवाई चौक यांना मिळाल्याने मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे, माजी अध्यक्ष प्रशांत लांडे, रणजीत गायकवाड, सिकंदर मण्यार, शाम परदेशी, अविनाश जाधव,मुकुंद ढोबळे, साई परदेशी यांनी प्रथम क्रमांकाची बक्षीस स्वीकारले.

     शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या 2024 गणराया अवॉर्डमध्ये खालील प्रमाणे गणपती मंडळांना सन्मानित करण्यात आले असून प्रथम क्रमांक हलवाई चौक गणेश मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक डंबेनाला गणेश मित्र मंडळ, तिसरा क्रमांक कापड बाजार गणेश मित्र मंडळ, उत्तेजनार्थ छत्रपती संभाजी नगर गणेश मंडळ व सुवर्णयुग गणेश मित्र मंडळ हुडको कॉलनी, हनुमान गणेश मित्र मंडळ मारुती आळी, अजिंक्यतारा गणेश मित्र मंडळ मुंबई बाजार आदी आदी मंडळांना यावेळी सन्मान चिन्ह व प्रसिद्ध पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले या गणराया अवॉर्डचे परीक्षण प्रा. सतीश धुमाळ प्रा. विलास आंबेकर प्रा. चंद्रकांत धापटे डॉ. रविन बोरा अॅड सुप्रिया साकोरे यांनी केलं


,



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!