करडे गावात बिबट्याने कुत्र्याचे पिल्लू नेले उचलून... तर वनविभागाकडे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा नसल्याचे कारण... भयभीत नागरिक आश्चर्यचकित
शिरूर प्रतिनिधी
करडे ता.शिरूर चव्हाणवाडी रोडवरील इसवे-घायतडक वस्तीवर माजी सरपंच रुक्मिणी घायतडक यांच्या घराजवळून बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लाची शिकार केली असून यामुळे करडे भागात बिबट्याच्या दहशतीमुळे घबराट पसरली आहे. याभागात वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर शिरूर वनविभागाकडे पिंजरा उपलब्ध नसल्याचे कारण दिल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
१० जुलै गुरुवारी रात्री ९ वाजता करडे येथील माजी सरपंच रुक्मिणी घायतडक यांच्या घराजवळ बिबट्या आला व त्याने येथील अंगणात असणाऱ्या कुत्र्याचे पिल्लू बिबट्याने उचलून नेले, ही घटना सी सी टी व्हिकॅमेरा मध्ये कैद झाली आहे.
रानातल्या वस्तीवर राहणाऱ्या लोकांमध्ये इतक्या लवकर म्हणजे ९ वाजताच बिबट्या घराजवळ येत असल्याने दहशत पसरली आहे, वनविभागाला कळवले असता पिंजरा उपलब्ध नाही, लवकरच पिंजरा लावू असे आश्वासन अधिकारी यांनी दिले आहे.
या भागात आसपास लपायला जागा नसल्याने हा प्रवास करणारा फिरस्ता बिबट्या असावा असा अंदाज वनाधिकारी यांनी वर्तवला, परंतू अशीच सेम घटना १ महिन्यांपुर्वी याच घरी घडली होती, तेव्हाही एक कुत्रा गायब झाला होता, फक्त ती घटना CCTV मध्ये कैद झाली नव्हती,
त्यामुळे लवकरात लवकर या भागात पिंजरा लावण्याची व या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल घायतडक, व इसवे - दिवटे वस्ती वर राहणाऱ्या भयभित नागरिकांनी केली आहे.