शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील आंबळे या ठिकाणी दरोडा टाकून वृद्ध महिलांना मारहाण करून लाखो रुपयांचे सोने बळजबरी चोरून नेणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पकडण्यात पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व शिरूर पोलिस स्टेशन तपास पथकाला यश आले आहे. यातील संजय गायकवाड या अट्टल दरोडेखोरांचा म्होरक्याचा यात समावेश असल्याचे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे. त्याच्याकडून दरोड्याच्या दोन गुन्हयांसह ,जबरी चोरी, घरफोडी, असे चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले असल्याने पोलिसांच्या या कार्यवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंबळे येथील दरोड्यात या दोन आरोपींबरोबर त्यांची आणखी पाच साथीदार यांचा समावेश असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.
पकडलेले आरोपी अट्टल दरोडेखोर असून त्यांच्या वर जुने १३ व नवीन ६ दरोडे व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय तुकाराम गायकवाड (वय ४५ वर्षे, रा. धनगरवाडी, भोकरदन, जि. जालना) सागर सुरेश शिंदे (वय १९ वर्षे, रा. संत तुकाराम नगर मंठा ता मंठा जि जालना) या अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत कल्पना प्रताप निंबाळकर (वय 60, रा. आंबळे) यांनी फिर्याद दिली होती .
त्यावरून शिरूर पोलीस स्टेशन येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून शिरूर तालुक्यातील आंबळे गावात 6 जुलै 2025 रोजी पहाटेच्या सुमारास सहा अनोळखी दरोडेखोरांनी घरात घुसून दोन महिलांना हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील सोन्याचे डोरले व कर्णफुले , पायातील जोडवी, असा सोन्या-चांदीचे दागिने १ लाख ६४ हजार रुपयांचे जबरदस्तीने हिसकावून नेले होते.. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तसेच आंबळे गावातच या अगोदर पाच जून रोजी असाच जबरी चोरीचा प्रयत्न झाला होता त्यानंतर पुन्हा एकदा सहा जुलै एका महिन्यातच दुसरा दरोडा टाकला या गुन्ह्यांची गंभीर दखल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी घेऊन पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचेसहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, शिरूर पो स्टे चे अंमलदार नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, रविंद्र आव्हाड अजय पाटील या संयुक्त तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करता, चोरटयांनी गुन्हा करणेसाठी सिल्हवर रंगाचे चारचाकी तवेरा वाहनाचा वापर केल्याचे निष्पन्न झाले, त्या अनुषंगाने सुमारे १५० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित वाहन पाथर्डी परिसरातून पुढे गेल्याचे आढळले. दरम्यान पोलिस पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्हयातील संशयित तवेरा गाडी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय तुकाराम गायकवाड रा. भोकरदन जालना हा वापरत असून त्यानेच सदरचा गुन्हा त्याचे साथीदाराचे मदतीने केला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीचे आधारे संजय गायकवाड याचा शोध घेत असताना, संजय गायकवाड हा त्याचे ताब्यातील तवेरा गाडी घेवून त्याचे साथीदारासह नगर-पुणे रोडने पुणे बाजकडे जात आहे अशी माहिती मिळाल्याने या रस्त्यावर पोलिस पथकाने सापळा रचून संजय गायकवाड व सागर शिंदे दोन आरोपींना ताब्यात घेतले असता त्याची चौकशी केली असता त्यांनी आंबळे ता.शिरूर येथे दरोडा टाकून महिलांना मारहाण करून लुटल्याची व त्याबरोबर इतर आणखी एका दरोडेच्या गुन्ह्याची व जबरी चोरी घरफोडी अशा सहा गुन्ह्यची कबुली दिली आहे. शिरूर, शेवगाव, पारनेर, अकोला, मालेगाव याठिकाणी गंभीर गुन्हे केले आहेत.
तर या आरोपींवर जुने 13 अशाच प्रकारचे दरोडे जबरी चोरी चे गुन्हे दाखल असले तरी पोलिसांनी सांगितले.
पुढील तपास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आरोपी संजय तुकाराम गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर वायुवी जालना, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड, जळगाव, परभणी, लातूर या जिल्हयात एकूण १३ गुन्हे दाखल त्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असल्याने त्याचेवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणेत आलेली असून तो पाच वर्षे कारागृहात होता, मागील सहा महिन्यापूर्वी तो जामीनावर बाहेर आलेला आहे,
ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी घेऊन पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचेसहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, शिरूर पो स्टे चे अंमलदार नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, रविंद्र आव्हाड अजय पाटील या संयुक्त तपास पथकाने केली आहे.