शिरूर सविंदणे येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील हिसकावलेले मंगळसूत्र महिलेला शिरूर पोलिसांनी दिले परत - संदेश केंजळे पोलिस निरीक्षक
शिरूर प्रतिनिधी
सविंदणे ता. शिरूर येथील ७७ वर्षीय पायी चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील हिसकावून नेलेले सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र महिलेला पोलिसांनी वृद्ध महिलेला दिले परत तर या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.
ही घटना शिरूर तालुक्यातील संविदणे गावच्या हद्दीत २७ जानेवारी २०२५ रोजी घडली होती.मलठण - नारायणगाव अष्टविनायक हायवे रोडवरील बंटी हॉटेलजवळील एका कच्च्या रस्त्यावर सायंकाळी साडेपाच वाजता दोन अज्ञात इसमांनी ७७ वर्षीय वस्त्सलाबाई दत्तात्रय सुके, रा. खडकवाडी, ता. आंबेगाव यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले आणि मोटारसायकलवरून पळ काढला. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस अंमलदार भाउसाहेब ठोसरे यांनी सुरु केला. तपासादरम्यान आरोपी अनिल सोमनाथ गव्हाणे आणि अनिल नारायण गव्हाणे (रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरी गेलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले.
आज दिनांक ३० जून २०२५ रोजी शिरूर न्यायालयाच्या आदेशानुसार सदर सोन्याचे मंगळसूत्र जेष्ठ नागरिक वस्त्सलाबाई सुके यांना परत करण्यात आले.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलिस हवालदार बापू मांगडे आणि पोलिस अंमलदार भाउसाहेब ठोसरे यांच्या पथकाने केली
.