शिरूरच्या विद्याधाम प्रशालेमध्ये योगदिन उत्साहात संपन्न

9 Star News
0

 शिरूरच्या विद्याधाम मध्ये योगदिन उत्साहात संपन्न


शिरूर प्रतिनिधी 

       शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला विद्यालयात योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गिरवले योगाचे धडे...योग करीत साजरा केला योगदिन करत विद्यार्थांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

         विद्याधाम प्रशाला विद्यालयात योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा केला.

      यावेळी प्राचार्य गुरूदत्त पाचर्णे व पर्यवेक्षक दिगंबर नाईक यांनी आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले.याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक चंद्रकांत देविकर, मच्छिंद्र बनकर तसेच क्रिडा विभाग प्रमुख सचिन रासकर, शालेय क्रीडा स्पर्धा संतोषकुमार देंडगे, संदीप तानवडे, संजयकुमार बनकर,सुभाष गायकवाड,शरद दरवडे,पूनम पवार, कल्पना भोगवडे,संदिप यादव,प्रशांत साकोरे, दिलीप पालापुरे यांनी देखील विद्यार्थासमवेत योग प्रात्यक्षिक सादर केले.तर यावेळी विवेकानंद क्षीरसागर यांनी योग गीत सादर केले.योगाच्या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!