निरोगी जीवनासाठी योग आवश्यक: डॉ. सुजाता कोकरे
शिरूर डेक्कन स्कूल मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
शिरूर प्रतिनिधी
आरोग्यदायी व आनंददायी जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज योग व ध्यान धारणा करावी असे प्रतिपादन विख्यात शल्यचिकित्सक व शिरूर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सुजाता कोकरे यांनी केले.
डेक्कन स्कूल शिरूर मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर डॉ. नूतन क्षीरसागर, श्री. गणेश मराठे, व्ही. डी . कुलकर्णी, प्रा. संध्या कुलकर्णी, प्रख्यात योग तज्ञ श्री. सुधाकर पोटे, प्राचार्य डॉ समीर ओंकार , शिक्षिका श्रीमती जयश्री दांडगे, श्रीमती डायना बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी इयत्ता ६ वी , ७ वी व ८ वी तील विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. शाळेतील ५०० विद्यार्थांनी क्रीडा शिक्षक श्री. चंद्रकांत झांजे व श्रीमती. प्रिया नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार व एरोबिक्स सादर केले. डॉ. सुजाता कोकरे यांनी भारतीय संस्कृती व योगाभ्यास यांचे महत्व विशद केले. या वेळी योगाभ्यासासाठी गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड उपक्रमात सहभागी झालेल्या प्रा. संध्या कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षिका श्रीमती. शीतल ढवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रीमती. जयश्री दांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.