शिरूर येथील ओन्ली वुमन्स जिम व भाजपा शिरूर शहर महिला आघाडीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
शिरूर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शिरूर शहरातील ओन्ली वुमन्स जिम व भाजपा शिरूर शहर महिला आघाडीच्या वतीने योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करून योग दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील साई गार्डन या ठिकाणी सकाळी सहा वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रिया बिरादार यांनी योग काय असतो व तो कसा करावा याबद्दल माहिती दिली .
योग दिनानिमित्त योगी आचार्य गोपेश ब्रह्मपुरीकर यांनी योगाचे सर्व प्रकार घेऊन त्याचे आरोग्यासाठी महत्त्व समजून सांगितले..
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे, भाजपा उपजिल्हाध्यक्ष महिला मोर्चा वर्षा काळे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सरचिटणीस राजू शेख ,नगरसेवक विनोद भालेराव, शशिकला काळे आदिशक्ती महिला मंडळ, सविता बोरुडे आधार छाया फाउंडेशन, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सुजाता पाटील, प्राध्यापक सतीश धुमाळ भाजपाचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे ,विजय नरके, नवनाथ जाधव, नीलमधू शर्मा, दिलीप जी हिंगे, योगेश जामदार, हुसेन शहा,आकाश चाकणे अजित डोंगरे, शिवसेनेचे सुरेश गाडेकर, प्रमोद जोशी, साई गार्डन मंगल कार्यालयाचे संचालक समीर शेख तसेच प्रीती बनसोडे, विजयालक्ष्मी उपाध्याय ,जयश्री हारदे आधी उपस्थित होते..
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक ओन्ली वुमन्स जिमच्या संस्थापिका व भाजपाच्या महिला आघाडी अध्यक्षा प्रिया बिरादार यांनी केले व सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी आभार मानले.