शिरूरमध्ये आज मुंडण आंदोलन नीलेश वाळूज यांचा उद्यापासून अन्नत्याग करण्याचा पवित्रा

9 Star News
0


 शिरूर प्रतिनिधी 

         शिरूर तालुक्यातील आमदाबाद ते मलठन रस्ता आणि कोंढाणओढा पुलावरील निकृष्ट, अपूर्ण कामाच्या निषेधार्थ सामजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांचे बेमुदत सत्याग्रह आंदोलन सातव्या दिवशी राज्यशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराच्या निषेधार्थ निलेश वाळूंज यांनी मुंडण आंदोलन केले तर दोन महिलांनी आपल्या केसांचे बट शासनाला भेट दिली आहे.

       आज सामजिक निलेश वाळूंज , सागर रासकर , दादाभाउ कुरुंदळे , महिला कार्यकर्त्या कल्पना पुंडे , युवती मान्यता वाळूंज यांच्यासह अन्य कार्यकर्त्यानी मुंडण केले .

    यावेळी सुनिता वाखारे , सोनाली दसगुडे, भाऊसाहेब लाळगे,, गौतम कुदळे, शेखर कुरंदळे बबलू कुरुंदळे प्रताप दसगुडे ज्ञानदेव माऊली कुरंदळे सोमनाथ देव्हाडे , अर्णव कुरुंदळे आदी उपस्थित होते .

      या अनोख्या आणि आगळ्या वेगळया मुंडण आंदोलनाची शिरूर तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. तर सामजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.

     शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा ठेकेदारालाच पाठीशी घालण्याचे काम सुरू असून, तालुक्यात अनेक निकृष्ट आणि चुकीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरद हस्ताने सुरू आहे .सर्वात मोठा भ्रष्टाचार या खात्यात आहे परंतु शासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

         शिरूर तालुक्यातील आमदाबाद ते मलठण या रस्त्याच्या आणि याच रस्त्यावरील कोंढाण ओढा पुलाच्या अशास्त्रीय व निकृष्ट कामाच्या सखोल चौकशीबरोबरच तालुक्याच्या इतर भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे व निकृष्ट कामांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूज हे गेल्या सहा दिवसांपासून येथील तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून ठिय्या देऊन बसले आहेत. मात्र, शासन स्तरावर या सत्याग्रहाची दखल घेतली जात नसल्याने रविवारी दिनांक 8 जून रोजी शासकीय उदासीनतेच्या निषेधार्थ मुंडण करून आंदोलन केले आहे.


      हे आंदोलन निलेश वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली होत असून, तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. 


    आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संबंधित रस्त्यावरील कामांची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, तसेच आधी झालेल्या अपूर्ण व निकृष्ट कामांचे अहवाल जनतेसमोर सादर करण्याची मागणी सामजिक सामजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी करून सोमवार दिनांक ९ जून पासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!