टाकळी हाजीत सोळा वर्षीय युवतीचा बालविवाह
चार महिन्यांनी शिरुर पोलिसांत नऊ जणांवर गुन्हा दाखल
शिरूर
( प्रतिनिधी ) टाकळी हाजी ता. शिरुर येथे फेब्रुवारी २०२५ मध्ये एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह केल्याची खळबळजणक घटना नुकतीच समोर आली असल्याने शिरुर पोलिसानी सदर अल्पवयीन युवतीच्या आई, वडील, आत्या, पती, सासू यांसह तब्बल नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी हाजी ता. शिरुर येथील रहिवासी आणि युवतीची आत्या असलेल्या सुरेखा टिंगरे या महिलेने युवती सोळा वर्षीय असल्याची माहिती असताना देखील युवतीचे नातेवाईक अशा काही महिला व पुरुषांना घरी एकत्रित करुन युवतीच्या लग्नाबाबत चर्चा करुन युवतीचा बालविवाह करुन दिला मात्र त्यांनतर युवती पतीच्या घरी गेलेली असता युवतीचे पती, सासू, नणंद तिला त्रास देऊ लागल्याने याबाबत पिडीत युवतीने पोलीस स्टेशन गाठले, सदर अल्पवयीन विवाहितेने आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी नवनाथ हिरालाल आग्रे, जयश्री नवनाथ आग्रे, अंजना आग्रे सर्व रा. म्हसोबाचा झाप ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, सुरेखा सुनिल टिंगरे, पती शिवसंदुर सुभाष खामकर, सासु विमल सुभाष खामकर, नणंद वैष्णवी सुभाष खामकर, सुभाष खामकर, सोमनाथ खामकर सर्व रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत सदर गुन्हा शिरुर पोलिसांकडे वर्ग केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस दिपक निरीक्षक करांडे हे करत आहे.