शिरूर येथील डॉक्टर पत्नीला मारहाण व छळवणूक केल्याप्रकरणी पती सह सासू सासरे अशा पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे

9 Star News
0


 शिरूर प्रतिनिधी 

     डॉक्टर महिलेला माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत डॉ. पूजा महेश शेळके (वय-२८, रा. बाबूराव नगर, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

      याप्रकरणी पती महेश सुरेश शेळके, सासू द्वारका सुरेश शेळके, सासरे सुरेश चंदरराव शेळके (सर्व रा. श्रीराम नगर सोसायटी, खराडी बायपास, पुणे) यांच्यासह सोनाली विवेक नेवाळे (रा. पिंपरी, पुणे) व चैताली प्रफुल्ल रनवरे (रा. वाघोली, पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, डॉ. पूजा शेळके या येरवडा येथील सह्याद्री हॉस्पिटल मधे कार्यरत असून, काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेले.मात्र, गेल्या वर्षभरात (जानेवारी २०२४ पासून) त्यांचे पती महेश व कुटूंबांतील इतरांनी तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, असे म्हणत मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करीत सतत अपमानीत केले. तसेच डॉ. पूजा यांचे वडील, आई व भावालाही वारंवार फोन करून शिवीगाळ केली.

       डॉ. पूजा शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार शिरूर पोलिसांनी त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दीपक राऊत करीत 

आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!