शिक्रापूरमध्ये मद्यधुंद तरुणाचा महामार्गावर धिंगाणा नशेत वाहतुकीस अडथळा करत नागरिकांना देखील मारहाण

9 Star News
0

 शिक्रापूरमध्ये मद्यधुंद तरुणाचा महामार्गावर धिंगाणा

नशेत वाहतुकीस अडथळा करत नागरिकांना देखील मारहाण


शिरूर 

( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे अहिल्यानगर महामार्गावर भर रस्त्यावर मद्यधुंद तळीरामाचा वाहनांना अडवून धिंगाणा घालत वाहनचालकांसह काही पाद चाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून ऋषिकेश कैलास सुकाळकर असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे.

                   शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे अहिल्यानगर महामार्गावर भर रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास एक मद्यधुंद युवक वाहनांना अडकून बसचा दरवाजा जबरदस्तीने उघडून प्रवाशांना त्रास देत काही नागरिकांना मारहाण करत धिंगाणा घालत काही कार वाहनांवर बसून वाहन चालकांना अडवत असल्याची पोलिसांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहानू बांगर, नारायण वाळके यांनी सदर ठिकाणी धाव घेत त्या युवकाला ताब्यात घेत विस्कळीत झालेली वाहतूककोंडी सुरळीत केली, याबाबत पोलीस शिपाई नारायण चंद्रकांत वाळके वय ३० वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी ऋषिकेश कैलास सुकाळकर वय २६ वर्षे रा. नेवासा फाटा उरतळ दुमाला ता. नेवासा जि. अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार बापू हाडगळे हे करत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!