शिरूर शहरातून चोरी गेलेले ४.६८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मूळ मालकांना केले परत -- संदेश केंजळे पोलिस निरीक्षक शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर शहरात घडलेल्या दोन स्वतंत्र दागिने चोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिरूर पोलिसांनी अतिशय तत्परतेने कारवाई करत तब्बल ४.६८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून मूळ मालकांच्या परत केले. पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलेआहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक ११ मे २०२५ रोजी शिरूर एस.टी. स्थानक परिसरात रूपाली अनिल काळे (रा. त्रिमूर्तीनगर, जळोची बारागटी, बारामती) यांचे ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे ६.१ तोळ्यांचे गंठण चोरीस गेले होते. तर दुसऱ्या घटनेत, दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरजनगर, शिरूर येथे छबुबाई नारायण बनसोडे (रा. पाचर्णेमळा, शिरूर) यांचे एक मणी मंगळसूत्र व कानातील सोन्याचे फुल – अंदाजे ७८ हजार रुपयांचे दागिने पाच जणांनी "आजी" म्हणून बोलावून दिशाभूल करून चोरी केले होते.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले.
या दोन्ही गुन्ह्यतील आरोपींना शिरूर पोलिसांनी अटक केली होती.
बसस्थानकातील गुन्ह्यात मनिषा विजय कसबे व शोभा शंकर दामोदर (दोघी रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली तर हरि बावरी राठोड, सुरज व राहुल राजपूत, गौरांग पटेल (सर्वजण गुजरात) व बबलु सोलंकी (रा. नागपूर) यांना अटक केली.
या दोन्ही गुन्ह्यातील सोन्याचे दागिने किंमत ४ लाख ६८ हजार रुपयांचे ऐवज पोलिसांनी जप्त केला व आज दिनांक २४ जून रोजी दोन्ही मूळ मालकांना शिरूर न्यायालयाच्या आदेशाने हे दागिने परत केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस हवालदार बापु मांगडे यांनी केली व फिर्यादी मूळ मालक,नागरिकांनी शिरूर पोलिसांचे आभार मानत त्यांचे मन:पूर्वक कौतुक केले आहे.