अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी शिरूरमध्ये एकाला अटक, दोन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त

9 Star News
0

 अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी शिरूरमध्ये एकाला अटक, दोन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त 


शिरूर, प्रतिनिधी 

      शिरूर पोलिसांनी रामलिंग परिसरात मोठी कारवाई करत, एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तूलं आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. शिरूर पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कारवाई...

   याबाबत प्रदिप श्रीकिसन तिवारी ( वय ४२ वर्ष, रा साईनगर, बी जे हाउसींग सोसायटी शिरूर ता. शिरूर जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

       याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिरूर पोलिस स्टेशन पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे यांना १५ जून २०२५ रोजी गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की, शिरूर ते रामलिंग रोडवर, रुद्रा टाईल्स दुकानाशेजारील येथे प्रदीप तिवारी हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे.या माहितीची तातडीने दखल घेत, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण,पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, सचिन भोई, निखिल रावडे, रवींद्र काळे, रवींद्र आव्हाड आणि अजय पाटील यांचे पथक तयार केले. पथकाला माहितीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

          पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि त्यांच्या पथकाने रामलिंग, शिरूर येथील रुद्रा टाईल्स दुकानाशेजारी सापळा रचला. त्यांनी प्रदीप तिवारी याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडती घेतली असता त्याच्याकडे

दोन गावठी बनावटीची पिस्तूलं आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला अटक करून भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शिरूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.

        शिरूर शहरांमध्ये अवैध रित्या रिवाल्वर गावठी पिस्तूल वापरून दहशत करणाऱ्या आरोपी बाबत माहिती असल्यास शिरूर पोलीस स्टेशन येथे कळवावे असे आवाहन करून माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!