कोंढापुरीच्या आश्रमशाळेच्या मुलांना शालेय साहित्य वाटप
शिरूर
( प्रतिनिधी ) कोंढापुरी ता. शिरुर येथील आशीर्वाद ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या गुरुकुल वसतीगृह आश्रम शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना नुकतेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले असल्याचे गरजू शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात मिळाला आहे.
कोंढापुरी ता. शिरुर येथे आशीर्वाद ट्रस्टच्या माध्यमातून शिवाजी शिंदे यांनी गुरुकुल वसतीगृह स्थापन करत भटक्या जमातीतील मुलांसह निराधार बालकांचा सांभाळ करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून त्या शालेय गरजू मुलांना आशिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांच्या संकल्पनेतून वह्या व पेन सह शालेय साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी गुरुकुल वसतीगृहाच्या संचालिका सावित्रा शिंदे, शिवाजी शिंदे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संचालक दत्ता कवाद हे उपस्थित होते, दरम्यान शालेय गरजू मुलांना शाळा सुरु होताच वह्या पेन मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते तर अशा प्रकारे भटक्या जमातीतील मुलांना एकत्रित करुन सांभाळ करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या संस्थेच्या मागे नागरिकांनी उभे राहणे गरजेचे असल्याचे मत निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संचालक दत्ता कवाद यांनी व्यक्त केले तर गुरुकुल वसतीगृहाचे संचालक शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – कोंढापुरी ता. शिरुर येथील गुरुकुल वसतीगृहाच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करताना पदाधिकारी.